Vidhansabha Election : सरकार घाबरल्यानं निवडणुका पुढं ढकलतंय…; सुप्रिया सुळेंचे टीकास्त्र

Vidhansabha Election : सरकार घाबरल्यानं निवडणुका पुढं ढकलतंय…; सुप्रिया सुळेंचे टीकास्त्र

Supriya Sule : केंद्रीय निवडणूक आयोगान (Central Election Commission) जम्मू-काश्मीर आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. मात्र, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा (Vidhansabha Election) कार्यक्रम जाहीर केला नाही. यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केंद्र सरकारसह राज्यातील महायुती (Mahayuti) सरकारवर टीका केली जात आहे. आता शरद पवार गटाच्या खासदासुप्रिया सुळेंनीही (Supriya Sule) यावर भाष्य केलं.

भ्रष्टाचाराचे आरोप करून पक्षात प्रवेश द्यायचा ही फडणवीसांचा स्टाईल; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल…. 

सरकार घाबरलं असल्यानं निवडणुका पुढे ढकलत आहे, अशी टीका सुळेंनी केली. पण, जनता हुशार आहे असून निवडणूक पुढे ढकलली तरी पुढचं सरकार आमचं येईल, असा विश्वास सुळेंनी व्यक्त केला.

सुप्रिया सुळेंनी आज जळगावात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयावर भाष्य केलं. विधानसभा निवडणुकां पुढ ढकलल्याविषयी विचारलं असता सुळे म्हणाल्या, सरकारला पराभवाची भीती आहे. नाहीतर ऑक्टोबरमध्ये हरियाणा बरोबर आपली निवडणुक व्हायला पाहिजे होती. नाहीतर पुढं ढकलायचं कारणच काय? आता देशात जेव्हा कश्मिर टू कन्याकुमारीपर्यंत निवडणुका झाल्या. मग आता विधानसभेला असं काय झालं की, महाराष्ट्राच्या निवडणुका पुढं ढकलल्या, असा सवाल सुळेंनी केला.

माझ्या बहिणींच्या विकासाच्या आड याल तर गाठ माझ्याशी…; CM शिंदेंचा विरोधकांना इशारा 

एकीकडे मोदी वन नेशन आणि वन इलेक्शनचा पुरस्कार करतात, आणि दुसरीकडे सोबत निवडणुका घ्यायला टाळाटाळ करतात. सरकार घाबरलेलं आहे. निवडणुका घ्यायची हिंमत सरकारमध्ये नाही. लोकसभेप्रमाणेच त्यांना विधानसभा निवडणुक हरण्याची भीती आहे, असं सुळे म्हणाल्या.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या काळातील चांगल्या योजना महाविकास आघाडी सरकारने बंद केल्याचं वक्तव्य केलं. त्याविषयी विचारलं असता सुळे म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस यांनी डेटा सांगावा, माझी त्यांच्याबरोबर कुठंही चर्चेला बसायची तयारी आहे, असं आवाहन सुळेंनी केलं.

दगड मारायचा आणि पळून जायचं ही भाजपला सवय आहे. भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि पक्षात प्रवेश द्यायचा ही फडणवीसांची स्टाईल आहे. चांगल्या योजना आजपर्यंत सरकारने नियमित सुरू ठेवल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांचं हे हे विधान बालिशपणाचं आहे, अशी टीका सुळेंनी केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube