…तर तुम्ही चव्हाणांच्या कुटुंबियांची माफी मागा; सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्लाबोल
Supriya Sule On BJP : आदर्श घोटाळ्या प्रकरणी अशोक चव्हाणांवरील आरोप खोटे असतील तर तुम्ही भाजपने चव्हाण कुटुंबियांची माफी मागितली पाहिजे, असा हल्लाबोल खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच भाजपच्या खासदारांनी आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाणांवर आरोप केले त्यानंतर लगेचच अशोक चव्हाणांना भाजपने राज्यसभेचं खासदार केलंय, अशी सडकून टीकाही सुप्रिया सुळे यांनी केली आहे. पुण्यात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
Jayant Patil : आंबेडकरांना विश्वासात घेऊनच निर्णय; जागा वाटपावर जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं
पुढे बोलताना सुळे म्हणाल्या, ज्यांच्यावर आरोप झाले, ज्यांनी पक्ष चिन्ह बदलले, आदर्श घोटाळ्यासारखं दुसरं उदाहण देशात नाहीये. देशाच्या अर्थमंंत्र्यांनी पाच वाजता आमच्यासमोर व्हाईट पेपर ठेऊन आदर्श घोटाळ्याप्रकरणी संसदेत आरोप केले. त्यानंतर भाजपच्याच खासदारांने अशोक चव्हाणांचे नाव घेऊन संसदेत आरोप केले. आरोप केल्यानंतर लगेचच अशोक चव्हाणांचा प्रवेश झाला होता. त्यानंतर ते लगेच एका आठवड्याच्या आतच राज्यसभेचेही खासदार झाले. आज त्यांच्या मुलाखीतीही सुरु झाल्या आहेत. चव्हाणांवरील आरोप जर खरे असेल तर ‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’ हे बोलवण्याचा अधिकार भाजपला नाही आणि जर खोटे असतील तर भाजपने चव्हाण कुटुंबियांची माफी मागितली पाहिजे की हो आम्ही केलेले आरोप खोटेे आहेत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
शेतकरी संघटनांना केंद्राचा एमएसपीचा प्रस्ताव; आंदोलक म्हणाले, सकारात्मक पाऊल उचला, अन्यथा..
तसेच यावेळी बोलताना राष्ट्रवादी पक्षाबाबत विधीमंडळ आणि निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालावरही सुप्रिया सुळेंनी थेट भाष्य केलं आहे. सुळे म्हणाल्या, ज्या माणसाने पक्ष स्थापन केला तो तुम्ही काढून घेतला त्याला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे की नाही? हा कुठला न्याय हा आमच्यावर अन्याय नाहीतर काय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानूसारच देश चालतो दडपशाहीने नाही, असंही सुळे म्हणाल्या आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी पक्षाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानेही फटकारलं आहे. शेजारील देश पाकिस्तानात जे चाललं आहे तसं राज्यात होतंय तसं होता कामा नये असं न्यायालयाने म्हटलं आहे. हे दुर्देव आहे, यशवंत चव्हाणांना काय वाटत असेल? निवडणूक आयोगाच्या निकालानंतर आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत आता तुम्ही आमचा नवीन पक्ष आणि चिन्हही काढून घेणार का? ही दडपशाही नाहीतर काय आहे इतिहासात असं कधीच झालं नाही, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.