रोड शो करून मोदींनी मृतांच्या नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळलं, कॉंग्रेसची घणाघाती टीका
Nana Patole on PM Narendra Modi : सोमवारी घाटकोपरमध्ये (Ghatkopar hoarding accident) पेट्रोल पंपावर एक अवाढव्या बेकायदेशीर होर्डींग कोसळल्याने 16 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. अशाच स्थितीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) घाटकोपरमध्ये रोड शो केला होता. त्यावरून कॉग्रेस आक्रमक झाली आहे. मोदींनी रोड शो करून मृतांच्या नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केल्याची टीका कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) केली.
एक कोटींची रोकड, सोन्याची बिस्कीटं…; लाचखोर पोलीस निरीक्षकाच्या घरी सापडलं कोट्यावधीचं घबाड
टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोलेंनी मोदी सरकावर घणाघाती टीका केली. ते म्हणाले की, लोकसभेची निवडणूक जनतेने हातात घेतली असून भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लोकांमध्ये प्रचंड रोष आहे. महाविकास आघाडी बहुमताने विजयी होईल, असे चित्र दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये थोडीही माणुसकी उरलेली नाही. घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेते 16 जणांचा मृत्यू झाला असून 70-75 जण जखमी झाले आहेत. मृत आणि जखमींच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करण्याची माणूसकीह मोदींनी दाखवली नाही. उलट घाटकोपरमधूनच रोड शो करून मोदींनी मृतांच्या कुटुंबीयांच्या जखमेवर मीठ चोळले आहे, अशी टीका पटोलेंनी केली.
उच्च न्यायालयाच्या इमारतीसाठी जमीन द्या; शिंदे सरकारला ‘सुप्रीम’ सूचना
या पत्रकार परिषदेला पवन खेरा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सोशल मीडियाचे अध्यक्ष विशाल मुत्तेमवार, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या माध्यम समन्वयक प्रगती अहिर आदी उपस्थित होते.
दरम्यान, घाटकोपर दुर्घघटनेतील आरोपी भावेश प्रभुदास भिंडे (51) याला काल उदयपूरमधून मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.