…तर पवारसाहेब 84 वर्षे जगले नसते; अस्वस्थतेवरून राणेंचा खोचक टोला….
Narayan Rane Criticize Sharad Pawar on PM Modi Statement : लोकसभेच्या निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदींचा ( PM Modi ) राज्यामध्ये सभांचा धडाका सुरू आहे. याच दरम्यान त्यांनी शरद पवार यांच्यावर ‘भटकती आत्मा’ म्हणत टीका केली होती त्यावरून शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी देखील त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. शरद पवारांच्या त्याच प्रत्युत्तरावर आता नारायण राणे ( Narayan Rane ) यांनी खोचक टोला लगावला आहे.
काय म्हणाले नारायण राणे?
नारायण राणे यांना महायुतीकडून सिंधुदुर्गमधून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यासाठी राणे यांनी प्रचार सभा घेतली त्यावेळी त्यांनी मोदी आणि पवारांच्या टीका-टीपण्णीवरून पवारांना टोला लगावला. राणे म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी राज्यामध्ये येऊन केवळ महाराष्ट्रात काही अस्वस्थ नेत्यांचे आत्मे भटकत आहेतय असं एक वाक्य वापरलं. ते काही जणांना म्हणजे शरद पवारांना लागलंय मात्र मोदींनी त्यांचं स्पष्ट नाव घेतलं नव्हतं.
Pankaj Tripathi: ‘मिर्ज़ापुर’ फेम अभिनेता पंकज त्रिपाठींने कामातून घेतला ब्रेक, मोठं कारण आलं समोर
त्यावर पवार म्हणाले महागाई आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मी अस्वस्थ आहे. पण पवार साहेब तुम्ही कधीपासून अस्वस्थ व्हायला लागला? तुमचं वय वर्ष 84 आहे. तुम्ही कसे काय अस्वस्थ? तुमची जनतेवर एवढी आस्था आणि प्रेम आहे का? या अगोदर तुम्ही किती वर्षे सत्य होतात. केंद्रीय मंत्री होतात, बारा वर्ष कृषिमंत्री होतात तेव्हा काय केलं. दुसरीकडे पंतप्रधान मोदी जगभरात देशाचे नाव मोठं करत आहेत. पण शरद पवार त्यांना चांगलं म्हणू शकत नाही. कारण ते कधी घरातल्यांना देखील चांगलं म्हटलेले नाहीत. ना बाहेरच्यांना.
बॉलिवूडच्या ‘काकां’चाही करिश्मा फेल; गांधीनगरचा ‘भगवा’ किल्ला अभेद्यच!
तसेच आजकाल अगदी कमी वयात हवामानामुळे आणि अस्वस्थतेमुळे लोकांना अटॅक येत आहेत. मात्र शरद पवार यांचं वय 84 वर्ष आहे ते नेहमी बिनधास्त राहतात कोणतंही संकट आलं तरी ते अस्वस्थ होत नाही. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार हीच पवारांचे अस्वस्थता आहे असे देखील यावेळी नारायण राणे म्हणाले.
पंतप्रधान मोदींच्या टीकेला पवारांचे प्रत्युत्तर…
पुण्यात मोदींची सभा पार पडली. या सभेत मोदी म्हणाले, ज्यांच्या इच्छा पूर्ण होत नाहीत त्यांची आत्मा भटकत असते, स्वत:चं काही झालं नाहीतर दुसऱ्यांचं बिघडवण्यात त्यांना अधिक चांगलं वाटतं. महाराष्ट्रही अशा भटकती आत्माचा शिकार झालेला आहे, काही वर्षांपूर्वी इथल्या एका बड्या नेत्यांने स्वत:च्या महत्वाकांक्षेसाठी हा खेळ सुरु केला असल्याची जहरी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर केली आहे.
Video : …म्हणून सांगलीत तिढा निर्माण झाला; पडद्यामागच्या सर्व गोष्टी पवारांनी सांगितल्या…
त्यावर पवारांनी प्रत्युत्तर देत म्हटलं की, मोदींचा सध्या माझ्यावर खूप राग असून त्यांनी याआधीच्या काळात भाषण केलं होतं की, मी शरद पवारांच्या बोटाला धरुनच राजकारणात आलो आहे. पण आता ते मला महाराष्ट्रात एक भटकती आत्मा असल्याचं बोलत आहेत. होयं माझा आत्मा अस्वस्थ आहे हे खरयं, पण स्वत:च्या स्वार्थासाठी नसून लोकांच्या दु:खासाठी, शेतकऱ्यांचे दु:ख पाहुन माझा आत्मा अस्वस्थ होत असेल तर त्यात गैर नाही. देशातली जनता सध्या महागाईने त्रस्त असून प्रपंच करणे अवघड झालं आहे, त्यामुळे जनतेसाठी मी 100 वेळा अस्वस्थ होणार असल्याचं शरद पवारांनी जाहीर सभेत सांगितलं.