नागपुर : उध्दव ठाकरे साहेब आणि मी उद्या नागपूरात बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलाय. ते म्हणाले, शिवसेना एकच असून ती शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करते. बाहेरचं वातावरण, शिवसैनिक महिला आघाडी सर्व जागेवर आहेत, दोन चार दलाल ठेकेदार गेले आहेत. बाकीचे कोणी नाही गेले. उद्या आमचं सरकार […]
अहमदनगरः काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे यांनी लेट्सअप सभा कार्यक्रमात दिलखुलास मुलाखत दिली. ते जिल्हा परिषदेचे दोनदा सदस्य होते. पहिल्यांदा सदस्य झाल्यावर अध्यक्षपदाची संधी कशी हुकली, दुसऱ्यांदा उपाध्यक्षपदाची संधी कशी हुकली, कोणी मदत केली, कोणी कसे राजकारण केले हे सर्व त्यांनी सांगितले. मी पहिल्यांदा २००७ मध्ये जिल्हा परिषद सदस्य झालो. त्यावेळी सर्व सदस्यांची अपेक्षा होती की […]
तनपुरेंनी मटक्यावाले, वाळुमाफीया आणि ख्रिश्चन मिशनरींचे हस्तक घेऊन काढलेला मोर्चा जनक्षोभ कसा? थोड थांबा तनपुरे २०२४ ला राहुरी मतदारसंघातला हिंदू तुमच्या विरोधात नक्कीच हिंदू एकता दाखवणार असल्याचा इशारा भाजपचे आमदार राम सातपुते यांनी दिलाय. अहमदनगरमधील ब्राम्हणी धर्मांतरण प्रकरणी राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांची बदली करण्यात आली. धर्मांतर प्रकरणात लक्ष दिलं नसल्याचा आरोप […]
पुणे : शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या विरोधात एकनाथ शिंदेंनी बंड का केलं? या बंडाची बीजं कोणी पेरली यासंदर्भात अनेक तर्कविर्तक लावले जात होते. परंतु विजय शिवतारे यांच्या दाव्यानंतर या चर्चांना वेगळं वळणं मिळालं आहे. बंडाची बीजं मीच एकनाथ शिंदेंच्या मनात पेरली असा दावा माजी आमदार आणि […]
जळगाव: संजय राऊत यांना किती गांभीर्याने घ्यावं हा आता खरं तर विचार करण्याचा विषय आहे. वाट्टेल तसं ते बोलत असतात. काहीही बोला, खोटं बोल पण रेटून बोल अशी सध्या संजय राऊत यांची अवस्था झाली आहे, असा शाब्दिक टोला भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी लगावला आहे. संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना मंत्री महाजन […]
मुंबई : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना देशाचे पंतप्रधान होण्याची संधी कधीच मिळणार नाही, असे रामदास आठवले म्हणाले. 2004 मध्ये संधी मिळाली तेव्हा सोनिया गांधी आणि काँग्रेस पक्षाने त्यांना पंतप्रधान होऊ दिले नाही, असे ते म्हणाले. आता वेळ निघून गेली आहे, आता त्यांना ही संधी मिळणार […]