बीड : बीडच्या आष्टी तालुक्यातील हातोळण औरंगपूर ग्रामपंचायत निवडणुकीत, अवघ्या 21 वर्षाची तरुणी सरपंच पदी विराजमान झालीय. भारती मिसाळ असं या तरुणीचे नाव असून बारामतीत कृषी पदवीचं ती शिक्षण घेत आहे. 684 मताधिक्यानं ती निवडून आली असून आज गावात तिची मिरवणूक काढून गावच्या लेकीचं कौतुक करण्यात आले. यंदा झालेली ग्रामपंचायत निवडणुक नेत्यांनी प्रतिष्ठेची बनवली होती. […]
कल्याण :’मी बजेटवर अवलंबून नाही, मी कॅपिटल मार्केटमधून पैसे उभे करतो. त्याचबरोबर जो रिटायर, पेंशनर, कॉन्स्टेबल आहे. जो नोकरी करतो त्याला 8 टक्के रिटर्न द्यायचे आणि त्यांच्या पैशातून महामार्ग बांधायचे.’ अशी महामार्ग बांधण्याची योजना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितली ते दि कल्याण जनता सहकारी बँकेच्या ५० व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते. […]
सातारा : भाजपचे साताऱ्यातील मान खटाव मतदार संघाचे आमदार जयकुमार गोरे यांचा अपघात झाला आहे. फलटणमध्ये त्यांची कार पुलावरून 50 फूट खाली कोसलळली त्यामुळे हा अपघात झाला. या अपघातात आमदार जयकुमार गोरे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रूग्णालयाकडून देण्यात आली आहे. पुणे-पंढरपुर रोडवर […]
अहमदनगर : कॉंग्रेस नेते सत्यजित तांबे यांच्या सिटीझनविल या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेसकडून तरुण नेत्यांकडे दुर्लक्ष होतं. आणि सत्यजित तांबे यांच्यावर आमचं लक्ष आहे, असं वक्तव्य केलं होतं. यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. याबद्दल कॉंग्रेस नेते सत्यजित तांबे यांना ‘लेट्सअप सभा’ या कार्यक्रमात विचारले असता. त्यांनी यावर आपली भूमिका […]
नागपूर : सध्या नागपूरमध्ये विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. आज अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. अधिवेशनामुळं सर्वच राजकीय पक्षांचे नेते नागपुरात आहेत. अशात मनसे अध्यक्ष राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर होते. त्यामुळं नागपुरात राज ठाकरे कोणाला भेटणार का? याबाबतची चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरु होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नागपूर दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधिमंडळात […]
मुंबई : कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद पुन्हा एकदा उफाळून आल्यानंतर राज्यात या मुद्द्यावरुन विरोधकांकडून सत्ताधारी सरकारला चांगलंच धारेवर धरल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच महाविकास आघाडीच्यावतीने कर्नाटक-महाराष्ट्र सीमा प्रश्नी हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामधील प्रमुख मागणी ही कर्नाटक-महाराष्ट्र सीमासंदर्भात होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा चांगलाच गाजलाय. महाराष्ट्र सरकारने तयार केलेल्या बेळगाव वादाचा […]