- Letsupp »
- politics
राजकारण
-
‘खेकडा गुणकारी प्राणी, त्याला सांभाळलं असतं तर’.. गुलाबरावांचा ठाकरेंना खोचक टोला
Gulaberao Patil replies Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या घेतलेल्या मुलाखतीचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझरमध्ये उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटातील आमदारांना खेकड्याची उपमा देत माझं सरकार वाहून गेलं नाही तर खेकड्यांनी फोडलं अशी घणाघाती टीका केली. या टीकेवर आता शिंदे गटाचे आमदार व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील […]
-
मातोश्रीवर तुमच्यासमोर झुकत होतो का? संजय शिरसाटांचा ठाकरेंना उपरोधिक सवाल…
Sanjay Shirsath On Udhav Thackeray : आम्ही मातोश्रीवर यायचो तेव्हा तुमच्यासमोर झुकत होतो का? असा उपरोधिक सवाल शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsath) यांनी उद्धव ठाकरेंना (Udhav Thackeray) केला आहे. दरम्यान, शिवसेनेच्या बंडानंतर शिंदे गटाच्या आमदारांना ठाकरेंकडून टोमणे मारल्याचं पाहायला मिळतंय. उद्या होणाऱ्या मुलाखतीच्या टीझरमध्येही त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांना दिल्लीत जाऊन झुकावं लागत असल्याचा […]
-
‘तुम्ही तिकडे गेले अन् गप्प बसले’; नाशिक-मुंबईच्या ट्राफिक जामवर थोरातांचा भुजबळांना चिमटा
Maharashtra Assembly Session : नाशिक मुंबई रस्ता वाहतूक कोंडीचा सापळा झाला आहे. काही मिनिटांच्या अंतरासाठी काही तासांच्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. या प्रश्नावर मंत्री सांगतात ऑगस्ट 2024 पर्यंत हा त्रास सहन करावा लागेल, हे अत्यंत असंवेदनशील आणि चुकीचे उत्तर आहे. नाशिक मुंबई रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर तातडीने मार्ग काढा, अशा स्पष्ट शब्दांत ज्येष्ठ नेते बाळासाहेब […]
-
शिंदेंचं मुख्यमंत्रिपद म्हणजे मावळणारा सुर्य, हे फडणवीसांनाही माहितीय; राऊतांचा टोला
Sanjay Raut : गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी पक्षामध्ये बंड करून राष्ट्रवादीचे नते अजित पवार हे भाजपसोबत शिंदे-फडणवाीसांच्या सत्तेत सामील झाले. त्यानंतर ते उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री झाले. त्यामुळे ज्या शिंदे गटाने अजित पवारांमुळे शिवेसेनेत बंड केल्याचं एक कारण सांगितलं होतं. त्यावरून त्यांची कोंडी झाली आहे. अशी स्थिती असताना आता थेट शिंदेंच्या जागी अजित पवार मुख्यमंत्री होणार […]
-
Mahadev Jankar : राजकारणातली सर्वात मोठी चूक कोणती? जानकरांनी बेधडक सांगूनच टाकलं
Mahadev Jankar criticized BJP : एकेकाळी भारतीय जनता पार्टीचे घनिष्ठ सहकारी म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांचे आता भाजपबरोबर खटके उडू लागले आहेत. जानकर यांनी आता भाजपविरोधाचा अजेंडा सेट करत राज्यातून जनस्वराज्य यात्रा काढली आहे. ही यात्रा काल कर्जत नगरीत दाखल झाली. या यात्रेदरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधत भाजपवर जोरदार प्रहार केले. जानकर […]
-
Video : ‘आमचं सरकार आहे, दादागिरी चालणार नाही’; भाजपाचा अमित ठाकरेंना सज्जड दम
Amit Thackeray : समृद्धी महामार्गावरील टोलनाक्यावर मनसे नेते अमित ठाकरे यांचे वाहन काही काळ थांबविण्यात आले. या प्रकारामुळे संतापलेल्या मनसैनिकांनी टोलनाक्याची तोडफोड केली. या घटनेचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटत आहेत. भाजपनेही मनसेच्या या राजकारणावर जोरदार टीका केली आहे. भाजपा महाराष्ट्रच्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये अमित ठाकरे यांना लक्ष्य करण्यात आले […]









