नागपूर : नागपूर न्यास जमीन प्रकरणावरून विरोधकांनी विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तर विधान परिषदेत विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावताना विरोधी बाकांवरील महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला. नागपूर न्यास प्रकरणात मी नगरविकास मंत्री अथवा मुख्यमंत्री म्हणून कोणताही गैरव्यवहार केला नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ […]
नागपूर : देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने आज एकनाथ शिंदे यांचे NIT प्रकरण ज्या सहजतेने सांगितले ते प्रकरण एवढे सोपे असते तर इतक्या वर्ष ते न्यायालयात का चालू होते ? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी आज नागपुरात पत्रकार परिषदेमध्ये विचारला. विधानसभा अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे काल नागपुरात दाखल झाले होते. अधिवेशनाला उपस्थिती लावल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी […]
नागपूर : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाने ९०० पेक्षा जास्त ठिकाणी विजय मिळवला असून महाविकास आघाडीच राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. भारतीय जनता पक्षाचे विजयाचे दावे खोटारडे आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्षाच्या जिल्ह्यातही भाजपाचा दारूण पराभव झाला असून गावखेड्यातील लोकांनी भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाला सपशेल नाकारले आहे, हे या निकालातून स्पष्ट झाले आहे, अशी प्रतिक्रीया काँग्रेस […]
अहमदनगरः कीर्तनकार निवृत्ती इंदोरीकर महाराज यांच्या सासू शशिकला शिवाजी पवार या थेट ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निवडणूक लढल्या. निवडून येत संगमनेर तालुक्याच्या निळवंडे गावच्या सरपंच झाल्या आहेत. शशिकला पवार यांनी अपक्ष निवडणूक लढविली. त्यांनी सरपंचपदाच्या निवडणुकीत सुशिला उत्तम पवार यांचा २२७ मतांनी पराभव केला. संगमनेर तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली. यात थोरात गटाने २७, विखे गटाने ९ […]
अहमदनगर – संगमनेर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत थोरात-विखे गटातील राजकीय संघर्ष पाहायला मिळाले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचे जन्म गाव असलेल्या जोर्वे गावासह तीन ग्रामपंचायतीतील सत्ता थोरात गटाला गमवावी लागली आहे. तर थोरात गटानेही निमगाव जाळी व उंबरी बाळापूर ग्रामपंचायतीत विखे गटाला प्रतिधक्के दिले आहेत. संगमनेर तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली. यात थोरात […]
नागपूर : अडीच महिन्याच्या बाळासह विधिमंडळात आलेल्या आमदार सरोज अहिरेंच्या हस्ते नागपूर विधिमंडळ इमारतीत हिरकणी कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. हिवाळी अधिवेशनासाठी तान्हुल्यासह आलेल्या आमदार सरोज अहिरे यांना बाळाची काळजी घेता यावी यासाठी आज विधानभवनात हिरकणी कक्षाची सुरूवात करण्यात आली. नागपूर येथील विधीमंडळाच्या विस्तारीत इमारतीतील दालन क्रमांक १०६ मध्ये हिरकणी कक्ष सुरू करण्यात आला आहे. आरोग्य […]