मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्षाविरोधात बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं युवा नेते सत्यजीत तांबे यांना काँग्रेसनं (Congress) चांगलाच दणका दिला होता. पक्षशिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवत पक्षानं तांबे यांना सहा वर्षांसाठी निलंबित केलं आहे. दरम्यान, आता आमदार सत्यजीत तांबे (Satyajit Tambe यांनी यावर भाष्य केलं. आमच्या कुटुंबाने काँग्रेससाठी 100 वर्षे दिली. […]
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुण्यातील शहर पदाधिकाऱ्यांपैकी संजय भोसले (Sanjay Bhosale) यांना पक्षातील सर्व पदांवरून बडतर्फ करण्याची कारवाई करून अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पक्षात शिस्तभंग खपवून घेतली जाणार नाही, असा संदेश सर्व कार्यकर्त्यांपर्यंत दिला आहे. या कारवाईमुळे मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील महाराष्ट्र सैनिक आणि पदाधिकारी संजय भोसले […]
मुंबई : राज्याचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अशातच ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी विधीमंडळाचा उल्लेख चोरमंडळ असा केला. त्यावर भाजप आणि शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यावर आक्षेप घेत भाजप नेते आशिष शेलार यांनी राऊतांवर कारवाईची मागणी विधीमंडळाच्या अध्यक्षांकडे केली. दरम्यान, राऊतांनी केलेल्या वक्तव्यामुळे सभागृहात गोंधळ झाल्यामुळे सभागृहाचं […]
कोल्हापूर : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे आज कोल्हापूर येथे भाषण झाले. यावेळी त्यानी शिंदे गट व भाजपवर जोरदार टीका केली. तसेच यावेळी बोलताना राऊतांनी शिवसेना पक्ष हा जनता पक्षामध्ये विलीन होणार होता, पण बाळासाहेब ठाकरेंनी त्याला नकार दिला, अशी आठवण सांगितली. ही आठवण सांगून त्यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. 1975 […]
Sanjay Raut : विधीमंडळाला चोरमंडळ म्हटल्यानंतर जो राजकीय गदारोळ उठला. राऊतांवर (Sanjay Raut) हक्कभंग आणण्याची मागणी केली गेली. विधानसभेचे कामकाजही तहकूब करण्यात आले. तरी देखील राऊत मात्र आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे दिसत आहे. आज कोल्हापुरात याची प्रचिती आली. येथे आयोजित जाहीर सभेत राऊत म्हणाले, की चोरांना चोर नाही म्हणायचे तर काय म्हणायचे. मी सुद्धा खासदार […]
प्रफुल्ल साळुंखे, विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी संजय राऊत यांच्या वक्तव्यावरून चांगलाच वाद रंगला. सभागृहात शिवसेना आणि भाजप आमदार संजय राऊत यांच्यावर तुटून पडले होते. संजय राऊतांच्या मुद्द्यावर सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाले. त्याआधी सभागृहाचे कामकाज 3 वेळा तहकूब झाले होते. सभागृहाचे कामकाज तहकूब झाल्यानंतर व्हरांडा, कॅंटिन किंवा पॅसेजमध्ये आमदारांचा गप्पांचा […]