‘राजकारणात येण्याशिवाय पर्याय नाही’; आंबेडकरांचा जरांगेंना पुन्हा सल्ला

‘राजकारणात येण्याशिवाय पर्याय नाही’; आंबेडकरांचा जरांगेंना पुन्हा सल्ला

Prakash Ambedkar : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांना (Manoj Jarange Patil) राजकारणात येण्याशिवाय पर्याय नसल्याचा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी दिला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचं आंदोलनाच सत्र गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. राज्य सरकारकडून कुणबी नोंदी असलेल्या मराठा बांधवांना प्रमाणपत्र दिले जात आहे. तर उर्वरित समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र सरकारने सगेसोयऱ्याची अंमलबजावणी करण्याच्या मागणीवर जरांगे पाटील ठाम आहेत. आरक्षण मिळवून द्यायचं असेल तर जरांगेंना राजकारणात यावं लागणार असल्याचं आंबेडकरांनी स्पष्ट केलं आहे.

Aayush Sharma: आयुष शर्माच्या ‘रुसलान’ चित्रपटाचा खतरनाक टीझर रिलीज

आंबेडकर म्हणाले, महाराष्ट्रामध्ये आयाराम गायरामचं राजकारण आपण पाहत आहोत. काही राजकारण्यांचे व्हिडिओ देखील रिलीज झालेत. जरांगे पाटील यांचे आंदोलन कुठल्याही राजकीय नेत्याला काबूमध्ये घेता येत नाही. म्हणून ना-ना तऱ्हेने ते विचलित करण्याचं काम सुरु आहे. जरांगे पाटील यांची मॉर्फिंग करून एक व्हिडिओ करण्यात आलेला आहे आणि त्यानिमित्ताने दबाव टाकण्याची शक्यता आहे. हे घाणेरडं राजकारण सुरु आहे. जरांगे पाटील यांनी यासंदर्भात दक्षता घ्यावी. टीव्ही सोशल मीडियावर दाखवले जात ते एडिटिंग होत त्यात बदल करता येतं त्याला इंग्रजीत मॉर्फिंग म्हणतात, जरांगे पाटलांनी त्यांचा प्रवास राजकीय प्रवास केल्याशिवाय अशा रितीच्या बदनामीपासून वाचू शकत नसल्याचं आंबेडकरांनी स्पष्ट केलं आहे.

राहुल गांधींचं जीव तोडून भाषण मात्र, पवार मोबाईलमध्ये व्यस्त; भाकरी फिरवण्याची चर्चा कुणाशी?

मराठा आरक्षणाचं बिल मंजूर झालं आहे ते टिकवणं ही पहिली जबाबदारी आहे आणि ते टिकवायचं असेल तर राजकीय पुढाकार घ्यावा लागणार असून प्रातिनिधीक स्वरूपात त्यांची व्हिसीबीलिटी असली पाहिजे. त्यांचाच समाजातून त्यांना विरोध करणारे आहेत, तेच त्यांना उत्तर राहील. ही लोकसभेची निवडणूक गेली की पावसाळा आहे, पावसाळा संपल्या संपल्या विधानसभा आहे . जरांगे पाटील यांनी हत्ती मध्ये टाकला आहे. फक्त शेपूट बाकी आहे. आता बाकीचे ती शेपूट धरून त्यांना बाहेर काढतील अण्णासाहेब पाटलांपासून मराठा आरक्षण प्रश्नाचं खोबरं झालं असल्याचंही आंबेडकर म्हणाले आहेत.

इंडियन बॅंकेत 146 जागांसाठी भरती सुरू, महिन्याला 89 हजार रुपये पगार, आजचा करा अर्ज….

माझी मागणी एवढीच की मनोज जरांगे यांनी लोकसभेसाठी उभं राहिलं पाहिजे. एक व्यक्ती सभागृहात लढू शकतो, एक व्यक्ती खूप काही करू शकतो. स्वातंत्र्य आरक्षण मंजूर नसेल तर ओबीसीमधून मिळेल पण राजकारणी बनूनच असंही आंबेडकर म्हणाले आहेत. दरम्यान, आंबेडकरांनी याआधीही जरांगे पाटलांना लोकसभा निवडणुकीत उभं राहण्याबाबत आवाहन केलं होतं. जरांगेंनी राजकारणात आलं पाहिजे असं मत आंबेडकरांनी मांडल आहे. मात्र जरांगेंकडून याबाबत कोणताही निर्णय घेण्यात येत असल्याचं दिसून येत नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube