ठाकरे भांडणं मिटवण्याऐवजी पेटवताय; आरक्षणाच्या भूमिकेवरून प्रकाश आंबेडकरांचे आरोप

ठाकरे भांडणं मिटवण्याऐवजी पेटवताय; आरक्षणाच्या भूमिकेवरून प्रकाश आंबेडकरांचे आरोप

Prakash Ambedkar Allegations Uddhav Thackery on Reservation : उद्धव ठाकरे (Uddhav Thackery) यांच्या शिवसेनेने जरांगे पाटील यांच्या मागणीच्या संदर्भात मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावं याबाबतीत मांडलेली भूमिका दुर्दैवी आहे. हा भांडणे मिटवण्याऐवजी भांडणे लावण्याचा हा प्रकार आहे. असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केली आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, नांदेडसह ‘या’ शहराला होणार फायदा

ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहेत की, आरक्षण मागणीच्या बाजूने आहात की विरोधात आहात हे मांडण्याऐवजी त्यांनी असे म्हटले आहे की, मोदींकडे जा आणि आरक्षण वाढवून घ्या. ते आरक्षण वाढवले की, मराठा समाजाला न्याय मिळेल. आम्ही याचा अर्थ असा काढतो की, ओबीसींचा विरोध आहे मराठ्यांना ओबीसीमध्ये घेण्यासाठी आणि उध्दव ठाकरे सुचवतात की, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावं. भांडणे मिटवण्याऐवजी भांडणे लावण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात शांतता भंग होण्याची शक्यता अधिक असल्याचेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.

सर्वच खासदारांनी मोदींना भेटून तोडगा काढावा…

आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा वाढवण्याचा अधिकार राज्याला नसून लोकसभेला आहे, त्यामुळे सर्वच खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून मोदींनीच यावर तोडगा काढावा, अशी भूमिका ठाकरे यांनी मांडलीयं. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मराठा आरक्षण प्रश्नी आंदोलकांनी भेट घेतली.

अभिनेता किरण माने आयसीयूमध्ये, आयुष्य किती अनप्रेडिक्टेबल असतं! म्हणत, केली पोस्ट

सत्ताधारी सरकारने काही दिवसांपूर्वी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती, पण राज्य सरकारने राजकारण्यांना बोलवण्यापेक्षा सर्वच समाजातील नेत्यांना बोलावून यावर तोडगा काढला पाहिजे, मात्र एकमेकांमध्ये भांडणे लावून सत्ताधारी राजकीय पोळी भाजत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केलायं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube