शाहांच्या ‘त्या’ विधानातून संघाच्या द्वेषभावनेचे प्रदर्शन, भाजपला देशात वर्णव्यवस्था…; पृथ्वीराज चव्हाणांची टीका
Prithviraj Chavan On Amit Shah : गेल्या काही दिवसांपासून संसदेत संविधानावर चर्चा सुरू आहे. या चर्चेदरम्यान, गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल (Babasaheb Ambedkar) कथित टिप्पणी केली होती. यावरून इंडिया आघाडीने (India Alliance) रान उठवलं आहे. त्यांच्या या विधानावर आता कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी भाष्य केलं.
संसदेत राडा! भाजप खासदारांनीच धक्का दिल्याचं कॅमेऱ्यात कैद; राहुल गांधींनी A To Z सांगितलं
शाहांचे विधान अत्यंत दुर्दैवी..
पृथ्वीराज चव्हाण यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. दरम्यान, आंबेडकरांचे नाव घेणे ही एक फॅशन झालीये. आंबेडकर-आंबेडकर असा जप करण्याऐवजी देवाचे नाव घेतले असते,तर पुण्य लागलं असतं या अमित शाह यांच्या वक्तव्याविषयी विचारले असता ते म्हणाले की, अमित शाहांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधातील हे विधान अत्यंत दुर्दैवी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मनात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल किती द्वेष भावना आहे, याचेच प्रदर्शन यातून झाले, अशा टीका चव्हाण यांनी केली.
भाजपला पुन्हा देशात वर्णव्यवस्था आणायची
पुढं ते म्हणाले, भाजपने वैचारिक हल्ला करावा. मात्र, द्वेषपूर्ण वक्तव्य करून समाजात विभाजन करण्याची भाजपची प्रवृत्ती आहे. लोकसभेला मोदींनी मुस्मीम समाजाला लक्ष्य केलं. भाजपला पुन्हा देशात वर्णव्यवस्था आणायची असल्याची टीका चव्हाण यांनी केली.
राज्यात सत्तेची साठेमारी सुरू
राज्यातील निवडणुका होऊन महिना संपत आला तरी खातेवाटप झालेलं नाही. याबाबत विचारले असता चव्हाण म्हणाले की, सध्याचे सरकार सत्तेची वाटणी आणि राज्याचा खजिना लुटण्याकरता तयार झाले आहे. राज्यात सत्तेची साठेमारी सुरू असून प्रचंड यश मिळाल्याने ते पचवणे त्यांना अवघड जात असल्याची टीका चव्हाण यांनी केली.
अखिल भारतीय काँग्रेसच्या वतीने गुरुवारपासून (26) कर्नाटकातील बेळगाव येथे दोन दिवसीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. महात्मा गांधी यांनी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्यांना 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन आयोजित केले जाणार आहे. पहिल्या दिवशी बैठक होणार असून दुसऱ्या दिवशी शुक्रवारी जाहीर अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनाला देशातील दिग्गज काँग्रेस नेते उपस्थित राहणार असल्याचं चव्हाण म्हणाले.
भाजपच्या जे पोटात, तेच अमित शाहांच्या ओठावर – गायकवाड
वर्षा गायकवाड यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, भारतीय जनता पक्षाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याने देशभर संतापाची लाट उसळली आहे. भाजपच्या जे पोटात होते तेच अमित शाह यांच्या ओठावर आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दलित, आदिवासी समाजाबद्दल भाजपची भूमिकाच यातून पुन्हा स्पष्ट झाली, असं गायकवाड म्हणाल्या.
अमित शहांनी राजीनामा द्यावा- मल्लिकार्जुन खर्गे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने गृहमंत्री अमित शाह यांचा राजीनामा घ्यावा. अन्यथा देशात उद्रेक होईल. लोक आंदोलन करतील. बाबासाहेबांसाठी आपले प्राण देण्यास अनेक जण तयार आहेत, असं खर्गे म्हणाले.