लोकशाहीवर विश्वास नाही, म्हणूनच…आंदोलन; राहुल नार्वेकर

लोकशाहीवर विश्वास नाही, म्हणूनच…आंदोलन; राहुल नार्वेकर

Rahul Narvekar Filed Nomination For Assembly Speaker election : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विधिमंडळ सदस्य ॲड. राहुल नार्वेकर यांनी (Rahul Narvekar) आज विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी विधिमंडळ सदस्य तथा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सदस्य चंद्रकांतदादा पाटील हे उपस्थित (Assembly Speaker election) होते.

शरद पवारांसमोरच महिलांचा एल्गार; म्हणाल्या, मारकडवाडीतल्या ठिणगीचा वणवा देशात पेटणार

यावेळी राहुल नार्वेकर म्हणाले की, आमच्या भाजप पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांचे आभार. त्यांनी विश्वास दर्शवला, पुन्हा एकदा संधी दिली. त्यामुळे आभार मानतो. ही जबाबदारी पूर्ण विश्वासाने ही जबाबदारी पार (Maharashtra Politics) पडेल. त्याचं वय किंवा अनुभव ग्राह्य धरला जात नाही, तर भाजपमध्ये त्याचं मेरिट तपासलं जातंय. लोकशाहीवर विश्वास नाही म्हणूनच आंदोलन केले जात आहे. लोकसभेत तक्रार केली नाही, तर आता अपयश आले तर खापर ईव्हीएमवर फोडलं जातंय, असं देखील राहुल नार्वेकर म्हणाले आहेत.

तुमच्याच गावात जमावबंदी का केली? शरद पवारांचा मारकडवाडीतील ग्रामस्थांना सवाल

लोकसभेला ईव्हीएम माध्यमातूनच निवडणुका घेतल्या. आता अचानक आपल्या विरुद्ध एखादी गोष्ट घडली किंवा कौल आला तर त्याचं खापर निवडणूक आयोगावर फोडायचं, हा केवळ प्रयोग सातत्याने करत आहेत. त्यामुळे संविधानिक संस्थांवरती, असे आरोप न करता त्यांच्यावर विश्वास ठेवून संविधानाने दिलेल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडायच्या. ही बाब सत्य आहे की, माझ्यावर सुद्धा अनेक लोकांकडून टीका झाल्या. निर्णय असेल किंवा आदेश असेल, त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या त्रुटी दाखवण्यात कोणीही यशस्वी झालं नाही.

उद्यापासून जेव्हा विधानसभा अध्यक्ष म्हणून कामकाज पाहिले. तेव्हा सर्व माझे सहकारी सहकार्य करतील. कोणताही पक्षपात न करता योग्य तो न्याय देईन. यावेळी राहुल नार्वेकर म्हणाले की, मला कोणत्याही प्रकारचा राजकीय वक्तव्य करायचं नाही. पण अंतिम निर्णय हा जनता जनार्दन घेत असते. जनतेने आपल्या मतदानातून निर्णय दाखवला आहे. विधानसभेत कोण विरोधी पक्षनेता असेल हा सर्वाधिकार विधानसभा अध्यक्षांचा आहे. मी अजून विधानसभेचे अध्यक्ष बनलो नाही, असं देखील नार्वेकर म्हणाले आहेत.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube