पुढील 24 तासांत INDIA आघाडीचाच पंतप्रधान होणार; राऊतांना भलताच कॉन्फिडन्स

पुढील 24 तासांत INDIA आघाडीचाच पंतप्रधान होणार; राऊतांना भलताच कॉन्फिडन्स

Sanjay Raut News : नरेंद्र मोदी (Narendra Modi) भुतपूर्व होणार असून 24 तासांत INDIA आघाडीचे नेते दिल्लीत पोहोचून पंतप्रधानपदाची घोषणा करणार असल्याचा भलताच कॉन्फिडन्स ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केलायं. दरम्यान, लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर एनडीए आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून आमचाच पंतप्रधान होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

Quotation Gang : ‘कोटेशन गँग’ चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शितच ‘या’दिवशी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला

संजय राऊत म्हणाले, पंतप्रधा नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत. मोदी भूतपुर्व होणार आहेत, पुढील 24 तासांत इंडिया आघाडीचा प्रत्येक नेता दिल्लीत पोहचणार असून आम्हीच पंतप्रधानपदाची घोषणा करणार असल्याचा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. तसेच इंडिया आघाडी देशाला 5 वर्षांचा पंतप्रधान देणार असून तो एकच पंतप्रधान असल्याचा दावा राऊतांनी केलायं.

राष्ट्रवादीची पावलं पुढे पडतायत; अजितदादांची अरूणाचलच्या विजयी शिलेदारांसाठी खास पोस्ट

उद्धव ठाकरे यांनी 20 तारखेला पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर मुंबईतील भाजपच्या पदाधिकाऱ्याने निवडणूक आयोगाला तक्रार दिली. त्यानंतर कारवाई होत आहे. शिवसेनेकडूनही निवडणूक आयोगाला आत्तापर्यंत 17 पत्रे पाठवण्यात आलीयं. मात्र, त्या पत्रांबाबत अद्याप निवडणूक आयोगाने कोणतीही दखल घेतलेली नाही. आयोग भाजपच्या पत्राची दखल घेऊन कारवाई करत असेल तर स्वागतच असल्याचा खोचक टोला राऊतांनी लगावलायं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी बनारसमधून केदारनाथला जात ध्यानाला बसतात, तेही दहा कॅमेरे लावून. माध्यमे त्यांची ध्यानधारणा सर्वत्र दाखवतात हा मुकप्रचार नाही का? सर्वच माध्यमांनी हा मोदींचा मूकप्रचार दाखवला, ती एक मूक पत्रकार परिषद होती? असा आरोपही संजय राऊत यांनी केलायं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज