‘सत्ता उलथवणार’ म्हणणाऱ्यांना देसाईंनी फटकारलं; म्हणाले, ‘प्रॅक्टिकली शक्यच नाही’

  • Written By: Published:
‘सत्ता उलथवणार’ म्हणणाऱ्यांना देसाईंनी फटकारलं; म्हणाले, ‘प्रॅक्टिकली शक्यच नाही’

Shambhuraj Desai on Uddhav Thackeray : पुढील वर्षात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका (Lok Sabha elections) होणार आहेत. या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्या असून या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली. जसजशा निवडणुका जवळ येत आहेत, तसे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आज ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. ही सत्ता उलथवून टाकण्यासाठीच मी उभा आहे, अशा शब्दात त्यांनी ठणकावलं. त्यावर आता शिंदे गटाचे नेते मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.

Eknath Khadase यांच्या डोक्यावर परिणाम, चप्पल घ्यायलाही पैसे नाही; महाजनांची बोचरी टीका 

आज माध्यमांशी बोलतांना शंभुराज देसाईंना ठाकरेंनी केलेल्या वक्तव्याविषयी विचारले. त्यावर बोलताना ते म्हणाले की, सत्ता उलथवणे हा नंतरचा विषय आहे. त्यांना सत्ता साध्य करायची असेल तर लोकांच्या दारात जावं लागलंत. चार भितींच्या
आत बसून बोलायचं आणि राज्यातील सत्ता उलथवून टाकण्याचं स्वप्न पाहायचं, हे काही प्रॅक्टिकली शक्य नाही, असं देसाई म्हणाले.

अहमदनगर महाकरंडक २०२४ ची प्राथमिक फेरी रंगणार आठ शहरांत 

पुढं बोलतांना ते म्हणाले, शिवसेना प्रमुख बाळासाहे ठाकरेंनी एकदा सांगतिलं होतं की, महाराष्ट्र विधानभवनावर युतीचीा झेंडा फडकवायचं. तेव्हा एका बाजूला बाळासाहेब ठाकरे आणि मुंडेंनी आडवा-उभा महाराष्ट्र पिंजून काढला होता. आता विधानसभा निवडमुकीला सहा महिने शिल्लक राहिले आहेत. तरीही उद्धव ठाकरे कुठं फिल्डवर दिसत नाहीत. त्यांच्या प्रकृतीमुळं त्यांना जास्त प्रवास करता येत नाही, हे समजू शकतं. पण, त्यांचे युवराज तरी कुठं लोकमध्ये जातात का? तेही कुठं दिसतं नाहीत. त्यामुळं ही फक्त ठाकरेंची वल्गना आहे. सोबतची चार माणसं टीकून राहावी, त्यांनी शिंदे गटात जाऊ नये, यासाठी ठाकरे केविलवाणा प्रयत्न करत आहेत, अशी टीका देसाईंनी केली.

ठाकरे काय म्हणाले?
उद्धव ठाकरेंनी आज केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले, सत्तेची भीती वाटत असेल तर उपयोग नाही. भीती वाटणारी सत्ता बदलल्याशिवाय पर्याय नाही, सत्ता ही सामान्य जनतेला आपली वाटली पाहिजे. सत्तेची भीती वाटत असेल तर ती उलथवलीच पाहिजे, त्यासाठीच मी उभा आहे. मला फक्त तुमची साथ हवी आहे, असं ठाकरे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube