पुढचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच…आमदार शहाजीबापू पाटलांनी क्लिअर सांगितलं
Shahajibapu Patil News : पुढचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं असल्याचं शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी क्लिअर सांगितलंय. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु असतानाच शहाजीबापू पाटलांनी थेट पुढचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं असल्याचं सांगितलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज सांगलीतील आटपाडी दौऱ्यावर होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत आज सांगलीतील विटा शहरात जाहीर सभा पार पडली. या सभेत शहाजीबापू पाटील बोलत होते.
शहाजीबापू पाटील म्हणाले, मुख्यमंत्रिपदावरुन अनेकांचे पोस्टर बॅनर झळकत आहेत, मात्र, राज्याचा मुख्यमंत्री ठरलेला आहे, सांगण्याची गरज नाही. राज्यातील जनतेने निर्णय घेतलेला आहे, फक्त मताच्या पेटीजवळ जायचं आणि तिथलं धनुष्यबाण बटन दाबलं की मशीन वाजणार आणि पुन्हा एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्री होणार असल्याचा विश्वास शहाजीबापू पाटलांनी व्यक्त केलायं. तसेच आम्ही गुवाहाटीला गेलो नसतो तर लाडक्या बहीणींना पैसे मिळाले असते का? गुवाहाटीला गेलो नसतो तर शेतकऱ्यांची वीजबिले माफ झाली असतील का? उपरोधिक सवाल शहाजीबापू पाटलांनी संबोधित करताना जनतेला केला आहे.
धक्कादायक! ११ हजार लोकांच्या घरांवर संकट; ‘या’ कारणामुळे अख्खा देशच पाण्यात बुडणार?
दरम्यान, महायुतीकडून सत्ता काबीज करण्यासाठी महाविकास आघाडीनं कंबर कसण्यात येत असल्याची चित्र आहे. सत्ता मिळाल्यावर मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल? याबाबतचा सस्पेन्स महायुती आणि महाविकास आघाडीत अजूनही कायम आहे. दोघांनीही अजून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केलेला नाही. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नव्या की जुन्या चेहऱ्यांना संधी मिळणार, याबाबत आता चर्चा सुरू आहेत.
रातोरात हजारो इस्त्रायली सैनिक लेबनॉनमध्ये घुसले; हिजबुल्लाच्या ठिकाणांवर हल्ले
2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात वेगवेगळी समीकरणं तयार झाली. महाविकास आघाडीच्या नावानं राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचं सरकार स्थापन झालं. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रं हाती घेतली. अवघ्या अडीच वर्षांनंतर भाजपानं महाविकास आघाडीला सुरुंग लावत, शिवसेना फोडून राज्यात युतीचं सरकार स्थापन केलं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत.
गेल्या पाच वर्षांत राज्यातील दोन प्रमुख पक्षांमध्ये झालेली फूट आणि राजकीय नेत्यांचा डावपेच यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात अराजकता निर्माण झाली. मात्र, या सर्व घडामोडीत आजी, माजी मुख्यमंत्री आणि महत्त्वाकांक्षी नवे चेहरे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याचं पाहायला मिळतंय, अशातच आता शहाजीबापू पाटलांनीही एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचं क्लिअर सांगितलंय.