उपोषणाला नाटक म्हणताच, रोहित पवार थेट संजय शिरसाटांना भिडले
Sanjay Shirsat and Rohit Pawar : एमआयडीसीच्या प्रश्नावरुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आज उपोषण केले. दबावाच्या राजकारणाला बळी पडून माझ्या मतदारसंघातील MIDC चा प्रश्न आश्वासन देऊनही सरकार मार्गी लावत नाही, असा आरोप करत रोहित पवार उपोषणाला बसले होते. यावर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. त्यावर रोहित पवार हे संजय शिरसाटांवर भडकल्याचे दिसून आले आहे.
संजय शिरसाट म्हणाले की, हे कसलं आंदोलन आहे. अडीच वर्ष सरकार होतं तेव्हा कुठे होतं हे एमआयडीसीचे आंदोलन. त्यावेळेला रोहित पवारांना बोलता आलं नाही. एमआयडीसी काय आज निर्माण करायची आहे का अडीच वर्ष काय करत होते. विधानसभा सुरु असताना काही आमदारांना नाटकं करायची सवय आहे. त्यातूनच हे नाटकं सुरु आहे,असे म्हणत शिरसाटांनी रोहित पवारांच्या आंदोलनावर टीका केली.
अध्यक्षांनी फटकरालं, अजितदादांनी झापलं, सामंतांनी समजावलं : रोहित पवारांचं उपोषण मागे
यावर रोहित पवारांनी जोरदार उत्तर दिले आहे. रोहित पवार म्हणाले की, शिरसाट साहेबांना मी विनंती करतो. उगाच पाठीवर काहीतरी बोलण्यापेक्षा हिम्मत असेल तर माझ्या समोर या. तुम्हाला एखाद्या विषयातील माहिती नसेल तर बोलू नका. महाराष्ट्रातले प्रोजेक्ट महाराष्ट्रातून बाहेर गेले तेव्हा तुम्ही कुठे होतात? माझा मतदार संघ आणि महाराष्ट्राच्या युवांबद्दल, सर्वसामान्यांना बद्दल काही बोललात तर याद राखा, असे म्हणत रोहित पवारांनी शिरसाटांना सुनावले.
Assembly Session : अजितदादांनी झापलं; रोहित पवारांचं काही मिनिटात प्रत्युत्तर!
दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कडक शब्दांत फटकराल्यानंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी झापल्यानंतर आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी समजूत काढल्यानंतर आमदार पवार यांनी त्यांचं उपोषण मागे घेतलं आहे.