सुनेत्रा पवार मुख्यमंत्री बनल्यास आनंदच…कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी इच्छा व्यक्त केली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात संधी दिली दिल्यास राज्याचे नेतृत्व सुनेत्रा पवार यांनी करावे अशी इच्छा मंत्री दत्तात्रय भरणेंनी व्यक्त केलीयं.

Untitle (5)

Dattatray Bharne : राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या घडामोडी घडताना पहायला मिळत आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याच्याही बातम्या समोर येत आहेत. या मंत्रिमंडळ विस्तारात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात संधी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे. अशातच आता कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी (Dattatray Bharne) सुनेत्रा पवार मुख्यमंत्री बनल्यास आपल्याला आनंद होईल असं विधान केले आहे. भरणे यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगलीयं.

पुढचे दहा तास महत्वाचे; 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर मेघराजा बरसणार; हवामान विभागाचा अंदाज काय?

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, महाराष्ट्र वाट बघतोय की भारत देशात आपला मराठी माणूस एक नंबरच्या खुर्चीत बसावा. यशवंतराव चव्हाण, शरद पवार साहेबांना हुलकावणी मिळाली 2029 किंवा 2034 योग्य वेळी देशाचा प्रमुख महाराष्ट्राचा माणूस व्हावा अशी राज्यातील लोकांची इच्छा आहे. फडणवीस केंद्रात गेल्यावर राज्याचे नेतृत्व कोण करणार यावर बोलताना भरणे यांनी म्हटले की, याबाबतीत बोलणे उचित नाही, पण माझ्या पक्षाचा अध्यक्षा त्या खुर्चीवर बसण्याचा मला आनंद होणार आहे. सुनेत्रा पवार त्या खुर्चीवर बसल्या तर मला 100 टक्के पहिला आनंद मला होणार आहे.

पोलिस कोठडीत आरोपीचा मृत्यू…उदयनिधी स्टॅलिन यांचा जुना संदर्भ देत ‘विजय’ यांच्यावर निशाणा…

देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यास राज्याचे नेतृत्व एकनाथ शिंदे करतील असा दावा शिवसेनेच्या नेत्यांनी केलेला आहे. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे एकनाथ शिंदे यांनी आधीही राज्याचे मुख्यमंत्रीपद भुषविले आहे. तसेच त्यांना मंत्रिदाचा आणि प्रशासनाचाही मोठा अनुभव आहे. त्यामुळे जर आगामी काळात देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तर राज्याच्या नेतृत्वाची धुरा कुणाकडे जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

“पुढील दोन दिवसांत सोनम वांगचूक यांचा जीव जाऊ शकतो” हायकोर्टात केली वैद्यकीय मदतीची याचिका दाखल!

दरम्यान, गेल्या काही काळापासून राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या घडामोडी घडताना पहायला मिळत आहेत. सध्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याने या चर्चांना उधाण आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात संधी दिली जाणार असल्याचं बोललं जातंय. जर फडणवीस केंद्रात गेले तर राज्याचे नेतृत्व करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

follow us