‘लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणं म्हणजे…’; तटकरेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर
Sunil Tatkare On Raj Thackeray : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) तोंडावर महायुती सरकारने (Mahayuti) महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) आणली. या योजनेवरून विरोधक सरकारवर सातत्याने टीका करत आहे. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही या योजनेवरून सरकावर टीका केली. त्यांच्या टीकेला आता खासदार सुनील तटकरेंनी (Sunil Tatkare) प्रत्युत्तर दिलं.
‘कोण काय बोलतो यापेक्षा वरिष्ठांचा निर्णय महत्वाचा’; जागावाटपावर खासदार लंकेंचे सूचक विधान
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना स्वार्थी आहे, असं म्हणणं म्हणजे महाराष्ट्रातील अडीच कोटी महिलांचा अपमान आहे, असं तटकरे म्हणाले.
सुनील तटकरे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता दिल्यानंतर शासनाकडे सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारीत पगार द्यायलाही पैसे राहणार नाहीत, या राज ठाकरेंच्या वक्तव्याविषयी विचारले असता ते म्हणाले, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत राज ठाकरे काय बोलले? मला याबाबत काहीच माहिती नाही. पण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना स्वार्थी आहे, असं म्हणणं म्हणजे महाराष्ट्रातील अडीच कोटी महिलांचा अपमान आहे, असं मी मानतो. आता राज ठाकरे हे नेमकं कोणत्या हेतून बोलले हे मला माहीत नाही. पण तुम्ही दिलेल्या माहितीवरून मी बोलत आहे. लाडकी बहिण योजनेबाबत राज ठाकरे खरंच तसं बोलले असतील तर ते योग्य नाही, असं तटकरे म्हणाले.
‘…तर पवारांच्या इशाऱ्यावर जरांगे आंदोलन करत होते हे स्पष्ट’; प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान
दरम्यान, राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर महायुतीमधील प्रफुल्ल पटेल यांनी राज ठाकरेंवर पलटवार केला आहे. ज्यांच्या पोटात दुखतं तेच अशी वक्तव्य करतात, असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंवर टीका केली. आमच्या सर्व बहिणी आमचं स्वागतच करत आहेत, असंही ते म्हणाले
राज ठाकरे काय म्हणाले?
समाजातील कोणताही घटक फुकटात काहीही मागत नाही. सत्ताधाऱ्यांच्या स्वार्थासाठी योजना असेल तर परिणाम वाईट होतो. राज्य खड्ड्यात घातलं जात असेल तर ते चुकीचं आहे. महिलांना अशा प्रकारे पैसे न देता राज्यात नवीन उद्योग आणा, त्यांना रोजगार देऊन सक्षम केलं पाहिजे, असं म्हणत राज ठाकरेंनी योजनेवर अप्रत्यक्ष टीका केली. लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता दिल्यानंतर शासनाकडे सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारीत पगार द्यायलाही पैसे राहणार नाहीत. तिजोरी रिकामी होईल, असंही राज ठाकरे म्हणाले.