‘चंगु-मंगू मधला एक नेपाळी वॉचमनच्या पोरासारखाच दिसतो’; जाधवांनी राणे बंधूंना पुन्हा डिवचलं

‘चंगु-मंगू मधला एक नेपाळी वॉचमनच्या पोरासारखाच दिसतो’; जाधवांनी राणे बंधूंना पुन्हा डिवचलं

Bhaskar Jadhav On Nitesh Rane : चंगु-मंगू मधला एक नेपाळी वॉचमनच्या पोरासारखाच दिसतो, या शब्दांत ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी पुन्हा एकदा भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना डिवचलं आहे. दरम्यान, सिंधुर्दूगातील कणकवलीमध्ये ठाकरे गटाची सभा पार पडली. या सभेतून भास्कर जाधवांनी शिंदे गटाच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे.

भास्कर जाधव म्हणाले, चंगू-मंगू मधला एक नेपाळी वॉचमनच्या पोरासारखाच दिसतो, तो सकाळ, संध्याकाळ टिव्ही चालू केला की घाणेरडा थोबाड समोर येतं असतं. सकाळ संध्याकाळ अशी तळपायाची आग होत असल्याची टीका भास्कर जाधवांनी केली आहे.

मी पूर्वीही कोंबडीवरच बोललो आहे. त्यानंतर लघु मद्य आणि सूक्ष्मवरही बोललो आहे. नारायण राणेबद्दल मला बाळासाहेबांनी एकदा फोन करुन म्हणाले, अरे भास्कर ह्या भ… नाऱ्यावर मी काय अन्याय केला रे… असा सवाल केला असल्याचं भास्कर जाधवांनी सांगितला. त्यावेळी मुंबईतील घाटलाव्हिलामधील या कोंबडी विक्रेत्याला बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री केलं होतं, पण तोच आज गरळ ओकत आहे. त्यावर बाळासाहेब म्हणाले, तो माझ्यावर उद्धववर गरळ ओकतोयं पण मी आज सांगतो हा नाऱ्या (नारायण राणे) पदासाठी दारोदारी भटकत फिरेल हा माझा शाप आहे, असा शाप बाळासाहेबांनी दिला असल्याचं भास्कर यांनी सांगितलं आहे.

अख्खी इंडस्ट्री पूनमच्या विरोधात असताना दिग्दर्शकाने दिला पाठिंबा, अन् स्वत:च झाला ट्रोल

तसेच बाळासाहेब ठाकरे हे एक सिद्ध पुरुष होते. त्यांनी त्यावेळी केलेलं भाकीत आज खरं झालं आहे. हे लोकं आज दारोदारी भीक मागत फिरत आहेत. या सिंधुदूर्गग जिल्ह्यात अनेकजण महापौर, आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य झाले आहेत. एक मनोहर जोशी आणि दुसरा म्हणजे हा नागोबा असा उल्लेख भास्कर जाधव यांनी नारायण राणे यांचा केला आहे.

उद्धव ठाकरेंनाच पुन्हा मुख्यमंत्री कारायचयं…
ठाकरे घराण्यांच्या चार चार पिढ्यांची अनेकांना मोठं केलं आहे. प्रबोधनकार ठाकरेंपासून ते उद्या आदित्य ठाकरेंपर्यंत पण कुठलंही पद ठाकरे घराण्याने घेतलं नाही. एकदाच फक्त उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर तुमच्या पोटात कळ उठली आहे, आरोप आणि टीका करीत असल्याचं भास्कर जाधव म्हणाले आहेत. दरम्यान, मला शिवसेनेचा शिवसैनिकच मुख्यमंत्री करायचा, असा उद्धव ठाकरेंचा आजही पवित्रा आहे
ज्या लोकांनी उद्धव ठाकरेंना गादीवरुन खाली ओढलं, त्या गादीवर उद्धव ठाकरेंना बसवल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा निश्चय कोकणवासियांनी करावा, असं आवाहन भास्कर जाधव यांनी यावेळी केलं आहे

follow us
  • fb
  • instagram
  • youtube