Ajit Pawar : ‘चांगलं शिक्षण द्या नाहीतर गाठ माझ्याशी’.. शरद पवारांसमोरच अजितदादांची स्टाफला तंबी
Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर आज दौंड येथे अनंतराव पवार इंग्लिश मिडियम स्कूलच्या नवीन वास्तूच्या उद्घाटनानिमित्त आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) एकाच व्यासपीठावर आले होते. त्यामुळे दोघेही काय बोलणार याची उत्सुकता होती. या व्यासपीठावर अजित पवार (Ajit Pawar) यांनी राजकीय भाष्य खुबीने टाळले. शिक्षणाच्या क्षेत्राची, शाळेच्या इतिहासाची माहिती दिली. शरद पवार (Sharad Pawar) यांच्यानंतर अजित पवार यांचे भाषण झाले. अजितदादांनी भाषणाची सुरुवातच आदरणीय पवार साहेब असे म्हणत केली. तसेच येथे चांगलं शिक्षण द्यावं अशी तंबी त्यांनी शाळेच्या कर्मचाऱ्यांना तंबीही दिली.
सुरुवातीलाच पवार साहेबांचं नाव पण, पुढे…
स्टाफला सांगतो, शाळेला अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूल नाव दिलं आहे. या नावाला साजेसं शिक्षण मिळालं पाहिजे. कुणी कमी पडत असेल तर माझ्याशी गाठ आहे. इथं येणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना शिक्षण घेतल्यानंतर लाथ मारील तिथं पाणी काढलं पाहिजे अशी धमक त्यांच्यात निर्माण झाली पाहिजे अशा शब्दांत अजित पवार यांनी शाळा कर्मचाऱ्यांना तंबी दिली.
ठाकरेंपाठोपाठ चव्हाणांवरही मोठी जबाबदारी; दोन मराठी चेहरे काँग्रेसला तेलंगणा मिळवून देणार?
पवार साहेबांनी शेती क्षेत्रासाठी कृषी विकास प्रतिष्ठान स्थापन केलं आणि शिक्षणासाठी विद्या प्रतिष्ठानची स्थापना केली. पुणे आणि जिल्ह्यात या संस्थेचं मोठं जाळं आहे. इंदापूरमध्येह शाळेची शाखा सुरू झाल्याने इंग्रजी माध्यमाची शाळा आम्ही पवार साहेबांच्या माध्यमातून सुरू केली. विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक क्षेत्रातलं मोठं नाव आहे. गुणवत्ता जोपासण्यासाठी आणि गरीबांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत असतो. आज अनंतराव पवार इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या इमारतीचं एक लाख स्क्वेअर फुटाचं बांधकाम झालं आहे. स्वामी चिंचोली येथे शिक्षणासाठी मोठं संकुल उभारल गेलं आहे त्यामुळे शिक्षणाचा दर्जा आणखी सुधारण्यास मदत होईल, असे अजित पवार म्हणाले.
पालकमंत्री म्हणून माझे लक्ष आहेच
विविध सुविधा देण्याचे काम या प्रतिष्ठानतर्फे केले जात आहे. खेळाचे मैदान तसेच विविध खेळांचे प्रकार आणि त्याच्या सुविधा देण्यात येत आहेत. या परिसरात पाण्याची थोडी कमतरत आहे. पण या भागात राहुल कुल आणि दत्ता भरणे आमदार आहेत. मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून याकडे लक्ष देत आहे. संस्थेने 25 कोटी रुपये खर्च केला आहे. या माध्यमातून येथे विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम केले जात असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
‘…तेव्हा मी पहिल्यांदा विधानसभेत गेलो’; अजितदादांसमोरच शरद पवारांनी सांगितला ‘तो’ किस्सा