‘एकाला मोक्काच्या कारवाईतून वाचवलं…’; अजितदादांचं बारामतीत वादग्रस्त विधान
Ajit Pawar News : विश्वास देवकाते यांच्या एका कार्यकर्त्याला मोक्काच्या कारवाईतून वाचवलं असल्याचं वादग्रस्त विधान उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं आहे. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार हालचाली सुरु असतानाच बारामतीत आयोजित सभेत अजित पवार यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे. अजित पवार यांच्या या विधानामुळे ते अडचणीत येण्याची शक्यता आहे. एक उपमुख्यमंत्री गुन्हेगारांना कसं वाचवू शकतो, असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे.
बारामतीमध्ये अजित पवार यांच्या कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होत. या मेळाव्यासाठी बारामतीमधील कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अजित पवार कार्यकर्त्याना मार्गदर्शन करताना हे वादग्रस्त विधान बोलून गेले आहेत. विश्वास देवकाते हे एका कार्यकर्त्यांला मोक्काच्या कारवाईतून वाचवण्यासाठी माझ्याकडे आले. त्यावेळी त्यांनी दादा एवढ्या वेळी मोक्काच्या कारवाईतून वाचवण्याची मला विनंती केली असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे.
Ranji Trophy Final : विदर्भावर मात करत मुंबईने 42 व्यांदा जिंकला रणजी ट्रॉफीचा किताब
अजित पवार यांना त्यावेळी अनेक सहकाऱ्यांनीही विनंती केल्यानंतर अजित पवार यांनी विश्वास देवकाते यांच्या कार्यकर्त्याला मोक्काच्या कारवाईतून वाचवलं असल्याचं खुद्द अजितदादांनी सांगितलं आहे. अजित पवार म्हणाले, “दादागिरी गुंडगिरी करु नका, विश्वास देवकाते यांच्या एका कार्यकर्त्याला पार मोक्का लागत होता. याबाबत मला सर्वच सहकाऱ्यांना सांगितलं की दादा एवढ्या वेळी मदत कर, एवढ्या वेळी वाचवा, त्यावर मी आत्ताचं सांगतो, एवढ्या वेळेस चुकला परत चुकला तर अजित पवारांकडे या कामासाठी यायंच नाही. मलाही अधिकारी म्हणत असतात, की दादा तुम्ही एवढं कडक
वागता आणि असं कसं पाठिशी घालता, त्यामुळे या गोष्टी माझा नाईलाज असतो, असं काही होऊ नका, चुकीचं वागू नका योग्य वागा”, असा सल्लाच अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऐन निवडणुकीच्या तौंडावर हे वादग्रस्त विधान जाहीर सभेत केलं आहे. त्यामुळे आता विरोधकांकडून अजितदादांच्या या विधानावरुन टीका टीप्पणी केली जाणार असल्याची शक्यता आहे. अजित पवार या विधानामुळे चांगलेच अडचणीत येऊ शकतात, अशीही शक्यता वर्वण्यात येत आहे.