‘बारामती लोकसभेची जागा अजितदादांकडेच’; बावनकुळेंनी सांगितलं
Baramati Loksabha : मागील काही दिवसांपासून राज्यात लोकसभा निवडणुकांसाठी (Loksabha Election) सर्वच पक्षांकडून मतदारसंघांची चाचपणी सुरु आहे. अशातच राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी आता बारामती लोकसभेच्या जागेवर दावा केला आहे. अद्याप यावर कोणताही निर्णय महायुतीकडून घेण्यात आलेला नसला तरी बारामती लोकसभेची जागा महायुती अजितदादांनाच देणार असल्याचं बोललं जात आहे. याच शक्यतेला भाजपकडून दुजोरा देण्यात आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) बारामतीची जागा अजितदादांकडेच फिक्स असल्याचं सांगून टाकलं आहे.
खासदारकीसाठी मोहोळ मैदानात अन् स्पर्धेतून बाद झालेल्या मुळीकांची सूचक पोस्ट चर्चेत
महायुतीच्या घटक पक्षांमध्ये सध्या जागावाटपाच्या मुद्द्यावरुन चर्चा सुरु आहे. अजित पवार गटाकडून महायुतीकडे 10 जागांची मागणी केली असल्याची सुत्रांची माहिती आहे. यामध्ये अजित पवार गटाने धाराशिव, परभणी, बुलढाणा, गडचिरोली, माढा, हिंगोली, बारामती, शिरूर, सातारा आणि रायगडची जागा मागितल्या आहेत. मात्र, भाजपकडून अद्याप अजित पवारांच्या मागणीला हिरवा कंदील दिलेला नाही. मात्र, यातील एक बारामतीची जागा अजित पवार यांनाच मिळणार असल्याचं बावनकुळेंनी सांगितलं आहे.
भाजपने नुकतीच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकाही जागेच्या उमेदवारांचा उल्लेख नव्हता. मात्र, दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील एकूण 20 जागांसाठी उमेदवार फिक्स करण्यात आले आहेत. अद्याप महायुतीमध्ये जागा वाटपाची बोलणी अंतिम झाली नसल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेने भाजपकडे गतवेळी लढलेल्या सर्व 22 जागांची मागणी केली होती. तर राष्ट्रवादीने 10 जागांची मागणी केली आहे. या मागणीनुसार भाजपने जागा वाटप केल्यास भाजपच्या वाट्याला अवघ्या 16 जागा येतात. त्यामुळे भाजपकडून जागावाटपाचा तिढा कसा सोडवला जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ICC Test Ranking : रविचंद्रन अश्विन नंबर वन! आयसीसी क्रमवारीत भारताचा बोलबोला
तर दुसरीकडे जागावाटपाच्या चर्चा सुरु असतानाच बारामतीत सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीच्या चर्चा सुरू आहेत.अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी तर थेट घोषणाच करून टाकली आहे. जर जागावाटपात बारामती मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाला तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारच निवडणूक लढतील अशी घोषणा तटकरे यांनी केली.
या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार सक्रिय झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती दिसत आहे. पक्षाच्या बॅनर्सवर अजितदादांसोबतच त्यांचेही फोटो दिसून येत आहेत. नुकतेच बारामती दाखल झालेल्या प्रचार रथावरही सुनेत्रा पवार यांचा फोटो दिसत आहे. अजितदादा म्हणाले त्याप्रमाणे त्या निवडणुकीला उभ्या राहिल्या आणि निवडून आल्या तर त्या पहिल्यांदाच खासदार होतील. यापूर्वी त्यांनी कधीही कोणतीही निवडणूक लढविलेली नाही. पक्षातही त्या सक्रिय नव्हत्या.