भोसरीत महेश लांडगे यांना कामगार वर्गातून प्रतिसाद; एका संघटनेकडून थेट पाठिंब्याचे पत्र
Bhosari Assembly Constituency : भोसरी विधानसभा मतदारसंघातून (Bhosari Assembly Constituency) महायुतीकडून आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर त्यांनी जोरदार प्रचार सुरू केलाय. त्यांना वेगवेगळ्या स्तरातून पाठिंबा मिळत आहे. राष्ट्रीय संरक्षण कामगार संघ (इंटक) सीईडी देहुरोड या संघटनेने महायुतीचे उमेदवार महेश लांडगे यांनी पाठिंबा दिलाय.
राष्ट्रीय संरक्षण कामगार संघाचे जनरल सेक्रेटरी बाळासाहेब गुंड यांनी एका पत्राद्वारे हा पाठिंबा व्यक्त केला आहे.
कामगार वर्गामध्ये आमदार महेश लांडगे यांना पसंती असल्याचे बोलले जात आहे. या निवडणुकीत कामगारांचे निर्णायक मतदार ठरणार आहेत. या संदर्भात बाळासाहेब गुंड यांनी महेश लांडगे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे आहे, आपण भोसरी विधानसभा मतदार संघामध्ये महायुती (भाजपा) च्या वतीने पुन्हा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून उभे आहात हे ऐकून आम्हांस खूप आनंद झाला आहे. आपणास पुन्हा उमेदवार म्हणून पाहणे म्हणजे हे आपल्या कार्याचे फळ आहे. त्यामुळे पुन्हा आम्हास आपल्या बरोबर निवडणुकीमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. यापूर्वी ही आपले काम केले आहे आणि यापुढेही करत राहणार आहे.
40 वर्षांच्या संघर्षाला न्याय! प्राधिकरण परतावा प्रश्न सुटला; आमदार महेश लांडगेंनी करुन दाखवलं!
आम्ही संरक्षण विभागामध्ये काम करणारे कामगार आणि आपल्या भोसरी विधानसभा क्षेत्रामध्ये राहणारे आणि आपल्यावर प्रेम करणारे असंख्य कामगार आहोत. आम्ही आमच्या परिवाराच्या वतीने आणि आमच्या मित्र परिवाराच्या वतीने आपणांस संपूर्ण पाठिंबा देत आहोत. असे या पत्रात म्हटले आहे.