Girish Bapat : जनसंघाची ही शेवटची पिढी होती; सोमय्यांनी दिला बापटांच्या आठवणींना उजाळा

Girish Bapat : जनसंघाची ही शेवटची पिढी होती; सोमय्यांनी दिला बापटांच्या आठवणींना उजाळा

Kirit Somayya On Girish Bapat Death :  भाजपचे ज्येष्ठ नेते व पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे काल निधन झाले आहे. आज त्यांच्या घरी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सांत्वनपर भेट दिली आहे. यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना बापटांबरोबरच्या आठवणी जागवल्या आहेत. बापट हे अन्यायाविरुद्ध संघर्ष करणारे नेते होते, असे सोमय्या म्हणाले आहेत.

भाजपच्या जनसंघाची ही शेवटची पिढी होती. एक हाडाचा कार्यकर्ता आम्ही सगळ्यांनी गमावला आहे. आमची एका पाठोपाठ एक पिढी जात आहे. आता येणाऱ्या  नवीन पिढीने गिरीश बापट यांच्याकडून शिकायचे आहे, अशा शब्दात त्यांनी बापट यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

Satej Patil यांचं महाडिकांना आव्हान : कुस्ती लढायची असेल, तर मर्दासारखं लढा…

सर्व राजकीय नेत्यांनी बापट यांच्याकडून आदर्शवादी नेता कसा असतो ते  शिकायला हवे, असेही ते म्हणले आहेत.  बापट यांनी आयुष्यभर अन्यायाच्या विरोधात संघर्ष केला. आपलं पुणे देशात पुढे जावे यासाठी ते  नेहमी प्रयत्न करायचे आणि पुणे प्रगत झाले यात  बापट यांचे मोठे योगदान आहे.

काळ पुढे सरकत राहतो. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या नंतर जनसंघ संपला असं वाटलं होतं पण प्रत्येक पिढी महाराष्ट्राला नवी उंची गाठून देत आहे, अशा म्हणत त्यांनी गिरीश बापट यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

Amit Shah ‘खरी शिवसेना आमच्यासोबत, सत्तासंघर्षांवर अमित शाह यांचं मोठं वक्तव्य

दरम्यान, काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गिरीश बापट यांच्याविषयी बोलताना भावूक झाले होते. गिरीश भाऊ यांचे पक्षापलिकडे जिव्हाळ्याचे संबंध होते, सातत्याने जमिनीशी नाळ ठेवणारे गिरीश भाऊ हे नेते होते. १५-२० वर्षांपूर्वी आम्ही जेव्हा मुंबईतील मॅजेस्टिक या आमदार निवासात राहायचो. तेव्हा गिरीशभाऊ हे आमच्यासाठी जेवण बनवायचे, अशी आठवण सांगताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अश्रू अनावर झाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube