Dagdusheth Mandir : कुर्यात सदा मंगलम’चे सूर निनादले

Dagdusheth Mandir : कुर्यात सदा मंगलम’चे सूर निनादले

पुणे : मंगलमूर्ती प्रसिद्ध आठ गणपती या पुण्यनगरीमध्ये… कसबा, गुपचुप, मोदी, माती, चिमणीच्या दर्शना जाऊ दे… सारसबाग तळ्यातला गणपती, त्याच्यापुढे दशभुजा… आठवा श्रीमंत दगडूशेठ गणपती या पुण्यनगरीमध्ये, त्याचे दर्शन मानवास घडता आनंद वाटे मना… कुर्यात सदा मंगलम् असे मंगलाष्टकांचे सूर श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात निनादले. अक्षता व फुलांची उधळण आणि पारंपरिक वेशात पुण्यातील प्राचीन व प्रसिद्ध गणपती मंडळांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत चैत्र शुद्ध द्वितीयेला दुपारी १२ वाजून ४१ मिनिटांनी श्री वल्लभेश मंगलम् हा श्री गणेश आणि देवी वल्लभा यांचा विवाह सोहळा मंदिरात थाटात पार पडला.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे भगवान श्री गणेश व देवी वल्लभा यांचा विवाह सोहळा मंदिरात आयोजित करण्यात आला होता. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे, विश्वस्त कुमार वांबुरे, राजाभाऊ घोडके, विलास रासकर, ज्ञानेश्वर रासने, विजय चव्हाण यांसह श्री कसबा गणपती मंदिराचे धनंजय ठकार, श्रीकांत शेटे, सारसबाग गणपती व दशभुजा गणपती मंदिराचे सुरेश भागवत, चिमण्या गणपती मंदिराचे श्रीराम शास्त्री आदी उपस्थित होते. ट्रस्टतर्फे पुणेरी पगडी व महावस्त्र देऊन देवस्थानांच्या प्रमुखांचा सन्मान करण्यात आला. वेदमूर्ती मिलिंद राहुरकर गुरुजी यांनी विवाह सोहळ्याचे पौरोहित्य केले.

श्री गणेश व देवी वल्लभा यांच्या मूर्ती सभामंडपात ठेऊन सर्व पारंपरिक विधी पार पडले. ब्रह्मवृंदांनी केलेल्या मंत्र पठणाने या विवाह सोहळ्याला वेगळी उंची प्राप्त झाली. सभामंडपात विविधरंगी पडद्यांची व फुलांची आकर्षक आरास करुन लग्नमंडपाचे स्वरुप देण्यात आले होते. ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्ते व-हाडी मंडळीच्या भूमिकेत असल्याने पारंपरिक वेशात लग्नसोहळ्यात सहभागी झाले होते.

Chandrashekhar Bavankule : मोदींना चोर म्हणणाऱ्या गांधींना ‘ओबीसी’ माफ करणार नाही!

भगवान श्री गणेशाच्या शक्तींचा उल्लेख केला की आपल्या डोळ्यासमोर देवी सिद्धी आणि बुद्धी यांचा विचार येतो. तथापि गाणपत्य संप्रदायात श्री गणेशांच्या विविध शक्तींचा उल्लेख केलेला आहे. परब्रह्म परमात्मा भगवान श्री गणेश आपल्या स्वानंदेश स्वरूपात एकटे एकटे विद्यमान असतात. कधीतरी त्या परमात्म्याला अनेकत्त्वाची इच्छा जागृत होते. या इच्छेला उपनिषदांनी एकोऽहम! बहुस्याम! अशा स्वरूपात वर्णन केले. ब्रह्मणस्पतीला अशी इच्छा झाल्यावर त्या इच्छापूतीर्साठी ते आपल्या योगमायेला जागृत करतात. ही त्यांची योगमायाच देवी वल्लभा नावाने ओळखली जाते. ती मोरयाची अत्यंत प्रिय असल्याने तिला वल्लभा असे म्हणतात.

एकट्याच मोरयाच्या स्वरूपात सर्व विश्वाचा आरंभ आहे. आता या मायेचा रूपात दोन स्वरूपात नटलेला असतो. त्यामुळे या देवी वल्लभेच्या प्रगटीकरणाची, मोरयाने तिच्यासह नटण्याची तिथी चैत्र शुद्ध द्वितीया असते. निर्गुण निराकार त्रिगुणातीत परब्रह्म म्हणजे भगवान श्री गणेश. तर आत्ममायायुक्त सगुण साकार त्रिगुणात्मक परब्रह्म म्हणजे श्री गुणेश. देवी वल्लभा आणि तिने युक्त असणाऱ्या भगवान वल्लभेशांच्या महामीलनाचा महोत्सव म्हणजे वल्लभेश मंगलम आहे. त्यामुळे हा सोहळा मंदिरात थाटात साजरा झाला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube