‘मी तरुणीवर अत्याचार केला नाही, आमचे संबंध सहमतीने…’; दत्ता गाडेचा पोलिसांसमोर धक्कादायक दावा

Datta Gade Said Not rape young woman : पुण्यात (Pune News) स्वारगेट बसस्थानकावर तरूणीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला पोलिसांनी आज मध्यरात्री अटक केलीय. त्याला दुपारी न्यायालयात हजर देखील केलं जाणार आहे. त्याअगोदर मात्र दत्ता गाडेने पोलिसांसमोर एक धक्कादायक दावा (Swarget Rape Case) केलाय. त्यामुळे प्रकरणाला नवा ट्विस्ट मिळाल्याचं समोर येतंय. दत्ता गाडेच्या या दाव्यामुळे सगळीकडे मोठी खळबळ उडाली आहे.
‘मी तरुणीवर अत्याचार केला नाही, आमचे संबंध सहमतीने…’; दत्ता गाडेचा पोलिसांसमोर धक्कादायक दावा
अटक केल्यानंतर दत्ता गाडे (Datta Gade) याला लष्कर पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आलंय. तिथं आरोपीची कसून चौकशी केली जातेय. तर पोलीस कोठडीतच दत्ता गाडे याने टाहो फोडल्याची माहिती मिळते. माझं चुकलंय. मी पापी आहे, असं म्हणत दत्ता गाडे रडत असल्याचं समोर आलंय. मी तरूणीवर अत्याचार केलेला नाहीये. आमचे संबंध सहमतीने झाले, असा दावा देखील दत्ता गाडेने पोलिसांसमोर केलाय, असं सांगण्यात येत आहे.
स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपीने तरूणीवर बलात्कार केला नाही, तर संबंध संमतीने झाल्याची कबुली दिलीय. यामुळे आता या प्रकरणात नवीन ट्विस्ट येण्याची दाट शक्यता आहे. पीडीत तरूणी आणि आरोपी हे पूर्वीपासूनच एकमेकांना ओळखत होते का? हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. जर दत्ता गाडे खरं बोलत असेल तर पिडीत तरूणी आरोपीवर असे खाेटे आरोप का करत आहे, हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय.
स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला पोलिसांनी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास बेड्या ठोकल्या आहेत. मागील दोन दिवसांपासून पोलीस त्याच्या मागावर होते. परंतु, दत्ता गाडेचा मोबाईल बंद असल्यामुळे शोध मोहिमेमध्ये अडथळा येत होता. अखेर दत्तात्रय गाडेला शिरुर तालुक्यातील गुनाट या गावातून अटक केल्याचं समोर आलंय. त्याला शोधण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा देखील वापर केला गेलाय.