डॉ. भूषण पटवर्धन यांचा अखेर राजीनामा; नॅकच्या नवीन कार्यकारी अध्यक्षाची निवड

डॉ. भूषण पटवर्धन यांचा अखेर राजीनामा; नॅकच्या नवीन कार्यकारी अध्यक्षाची निवड

पुणे : एकाच पदावर दोन व्यक्ती नियुक्त झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर नॅकचे (NACC) कार्यकारी अध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन (Dr. Bhushan Patwardhan) यांनी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर त्यांनी यूजीसीचे (UGC) अध्यक्ष प्रा. जगदेशकुमार (Prof. Jagdesh Kumar) यांच्याकडे राजीनाम्याचे पत्र पाठवले होते. डॉ. भूषण पटवर्धन यांनी शनिवारी पदाचा अधिकृतरित्या राजीनामा दिला आहे.

नॅक मूल्यांकनाच्या कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करूनही यूजीसी त्याकडे दुर्लक्षच करत असल्याने नॅकचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी राजीनामा देण्याची इच्छा प्रकट केल्याचे नुकतेच समोर आले होते. यूजीसीकडून डॉ. पटवर्धन यांच्या राजीनामा देण्याच्या इच्छेला मान्यता देण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी नॅकच्या कार्यकारी अध्यक्षपदी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे (Dr. Anil Sahasrabuddhe) यांची नियुक्ती करण्यात आली.

डॉ. पटवर्धन यांनी पदाचा अधिकृतरित्या राजीनामा देण्यापूर्वीच यूजीसीकडून डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याने एकाच पदावर दोन व्यक्ती नियुक्त झाल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे डॉ. पटवर्धन यांनी या संदर्भात कठोर शब्दांत नाराजी व्यक्त करत झालेल्या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी यूजीसी आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडे केली. या प्रकारातून केंद्रीय संस्थांच्या पातळीवरील सावळा गोंधळ उघडकीस आला.

अजय देवगणचा ‘भोला’ चित्रपटाचा ट्रेलर या दिवशी होणार प्रदर्शित

या पार्श्वभूमीवर डॉ. पटवर्धन यांनी शनिवारी प्रा. जगदेशकुमार यांना पत्राद्वारे अधिकृतरित्या राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले. यूजीसी, नॅक आणि देशभरातील उच्च शिक्षण संस्थाचा विचार करून राजीनामा देत आहे. घडलेल्या प्रकाराबाबत केलेली कृती ही नॅक आणि कार्यकारी अध्यक्षपदाचे पावित्र्य जपण्यासाठी होती, असे डॉ. पटवर्धन यांनी राजीनामा पत्रात नमूद केले.

पदाचा अधिकृतरित्या राजीनामा दिल्याने आता घडलेला प्रकार माझ्यासाठी संपला आहे. डॉ. अनिल सहस्रबुद्धे अनुभवी आणि कार्यक्रम आहेत. त्यामुळे आता ते देशातील उच्च शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यासाठी आणि नॅकची विश्वासार्हता निर्माण करण्याचे कार्य करतील अशी अपेक्षा आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube