Gopichand Padalkar Vs NCP : ‘पवार’ आडनावावरून टीका… पडळकरांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा!

Gopichand Padalkar Vs NCP : ‘पवार’ आडनावावरून टीका… पडळकरांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा!

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील राजकारण खराब करण्यासाठी एक विषवल्ली आणली, ज्याच नाव गोपीचंद पडळकर आहे. हा गोपीचंद पडळकर गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गरळ ओकत आहे. त्याची हिंमत इतकी वाढली आहे की, त्याने यावेळी देशाचे तुकडे करण्याची भाषा करत देशद्रोह केला आह. अशा भाजपच्या देशद्रोही आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पुणे शहर पोलिस आयुक्तंना निवेदन दिले आहे.

अधिवेशनातील शेवटच्या दिवशी विधान परिषदेत झालेल्या भाषणात व इंदापूर येथील झालेल्या सभेत भाषण करताना हा गुन्हा केला आहे. लवासा, बारामती व मगरपट्टा हे तीन वेगवेगळे राज्य करण्यात यावे. या तिन्ही राज्यांचे वेगवेगळे मुख्यमंत्री असावेत आणि या तिन्ही राज्यांचा मिळून एक वेगळा देश निर्माण करावा. ज्याचे पंतप्रधान शरद पवार यांना करावे, असे वक्तव्य करत देशाचे तुकडे करण्याची भाषा केली आहे. त्यांचे हे वक्तव्य भारताच्या संघराज्य व्यवस्थेला छेद देणारे असून याबाबत गोपीचंद पडळकर यांच्यावर तातडीने देशद्रोषाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

Sanjay Shirsath : मी काय अश्लील बोललो सिद्ध करा… लगेच राजीनामा देतो! – Letsupp

इंदापूर येथील जाहीर सभेत बोलताना गोपीचंद पडळकर याने ‘पवार हे या देशाला लागलेली कीड आहे, असे वक्तव्य करत पवार आडनाव असलेल्या अठरापगड जाती -धर्मातील विविध कुटुंबीयांचा व त्यांच्या जातीचा अवमान केला आहे. यापैकी आदिवासी व मागासवर्गीय या समाजाचे प्रतिनिधित्व करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी वडार समजाचे महेश पवार व घिसाडी समाजाचे माधव पवार यांनी त्यांच्या आडनाव व समाजाबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. ज्या गुन्हे अंतर्गत राहुल गांधींना दोषी ठरविण्यात आले. तोच गुन्हा गोपीचंद पडळकर यांच्यावर दाखल करत आम्हाला देखील न्याय मिळावा, अशी मागणी या पदाधिकाऱ्यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त यांच्याकडे केली.

पुणे शहर पोलीस आयुक्त या घटनेचा गांभीर्याने विचार करून यावर कार्यवाही करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे, असे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिष्टमंडळात प्रवक्ते प्रदीप देशमुख, किशोर कांबळे, महेश पवार, माधव पवार, मधुकर पवार, महेश हंडे, शशिकांत जगताप, दिपक कामठे, शुभम मताळे उपस्थित होते.

(234) Sushma Andhare : सुषमा अंधारे यांची स्फोटक मुलाखत | LetsUpp Marathi – YouTube

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube