…तर त्यांचे पाय तोडल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही; लेक मयुरेशच्या प्रचारासाठी आई मैदानात

  • Written By: Published:
…तर त्यांचे पाय तोडल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही;  लेक मयुरेशच्या प्रचारासाठी आई मैदानात

Harshada Wanjale : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हडपसर येथून मनसे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर, कोथरूड येथून किशोर शिंदे आणि मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचे चिरंजीव मयुरेश वांजळे यांना खडकवासला मतदारसंघातून (Raj Thackeray) उमेदवारी दिली आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी खडकवासल्यात मयुरेशसाठी प्रचारसभा घेतली. यावेळी, मयुरेशची आई हर्षदा वांजळे यांनी देखील उपस्थितांना संबोधित केलं.

आज या सभेला संबोधित करताना मला रमेश वांजळे यांची खूप आठवण येत आहे. मात्र, ते आजही आपल्यातच उपस्थित आहेत असं मला वाटतं. कधी कधी मला त्यांची उणीव भासते. २००९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी तुम्ही सर्वांनी रमेश वांजळे यांच्यावर विश्वास दाखवला होता. तोच विश्वास तुम्ही यावेळी मयुरेशवर दाखवाल, अशी मला अपेक्षा आहे असं आवाहन हर्षदा वांजळे यांनी केलं आहे.

शिक्षण, महिला, रोजगार ते गडकिल्ले; मनसेकडून जाहीरनामा प्रसिद्ध, काय म्हणाले राज ठाकरे?

राज ठाकरे यांनी मयुरेशवर विश्वास दर्शवला आहे. मयुरेश राज ठाकरेंचा विश्वास सार्थ ठरवेल, याबाबत माझ्या मनात जरा देखील शंका नाही. त्यामुळे मी तुम्हा सर्वांना आवाहन करते की येत्या २० नोव्हेंबरला रेल्वे इंजिन या आपल्या निवडणूक चिन्हासमोरचं बटन दाबून मयुरेशला भरपूर मतांनी विजयी करा असंही त्या म्हणाल्या आहेत.

रमेश वांजळे यांच्या पत्नी म्हणाल्या, ‘मला आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन करायचं आहे की आपल्यासमोर जे उमेदवार आहेत, ते व त्यांचे कार्यकर्ते आपल्या कार्यकर्त्यांना दमदाटी करत आहेत. मला तुम्हाला आवाहन करायचं आहे की तुम्ही त्यांच्या दमदाटीला भीक घालू नका. न घाबरता मयुरेशसाठी काम करा. तुमचा तडफदार, शिकलेला उमेदवार विधानसभेत पाठवा. मयुरेशचा प्रचार करत असताना तुमच्या केसाला जरी धक्का लागला तरी एक गोष्ट लक्षात ठेवा इथे तुमची आई उभी आहे. मी केवळ मयुरेशची आई नाही, मी तुमची देखील आई आहे असंही त्या म्हणाल्या आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube