कोल्हापुरकरांनी छत्रपतींच्या गादीलाच मत दिलं असून छत्रपती शाहु महाराज यांनी एक लाखांच्या लीडने महायुतीचे उमदेवार संजय मंडलिकांचा पराभव केलायं.
निवडणुकीचे निकाल समोर येत असून कुणालाच बहुमत मिळत नसल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर आघाडी आणि महायुतीची संख्या जुळवाजुळव सुरू झाली आहे.
सांगली लोकसभेत विजय खेचून आणत आम्हीच सांगलीचे किंग असल्याचं अपक्ष उमेदवार विशाल पाटलांनी सिद्ध करुन दाखवलं आहे.
कॉंग्रेसचे बळवंत वानखडे यांना आतापर्यंत 2 लाख 92 हजार 040 मते मिळाली असून त्यांनी 24739 मतांनी आघाडी घेतली आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी अखेर विजय खेचून आणत पराभवाचा वचपा काढला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा उदयनराजेंनी पराभव केलायं.
भाजपचे सुनील मेंढे यांना 1 लाख 72 हजार 790 मते मिळाली असून दीड हजार मतांनी पिछाडीवर आहेत.