मोठी बातमी : अब्रुनुकसानीच्या खटल्यात संजय राऊत दोषी; पुन्हा खावी लागणार तुरूंगाची हवा

  • Written By: Published:
मोठी बातमी : अब्रुनुकसानीच्या खटल्यात संजय राऊत दोषी; पुन्हा खावी लागणार तुरूंगाची हवा

मुंबई : अब्रुनुकसानीच्या खटल्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) दोषी आढळले आहे. मेधा किरीट सोमय्या यांनी राऊतांविरोधात खटला दाखल केला होता. कोर्टाने राऊतांना 15 दिवसांची कैद आणि 25 हजारांचा दंड ठोठावला आहे. (Mumbai court sentences Sanjay Raut to 15 days imprisonment in defamation case)

राऊतांविरोधात मेधा किरीट सोमय्या यांनी माझगाव कोर्टात याचिका दाखल केली होती. यात राऊतांवर अनेक आरोप करण्यात आले होते. या प्रकरणावर गेल्या काहीद दिवसांपासून सुनावणी सुरू होती. त्यावर आज अखेर माझागाव कोर्टाने निकाल देत राऊतांनी दोषी ठरवले आहे. राऊत दोषी आढळल्याने कोर्टाने राऊतांना 15 दिवासांचा तुरूंगवास आणि 25 हजारांचा दंड ठोठावला आहे.

Pune Rain: सरकारची उदासीनता, राजीव बजाज वैतागले; 35 मिनिटांच्या प्रवासाला लागले साडेचार तास

राऊत वरच्या कोर्टात जाण्याची शक्यता

राऊतांना दोषी ठरवत न्यायालयाने 15 दिवसांचा तुरूंगवास आणि 25 हजारांचा दंड ठोठावला आहे. त्यानंतर आता कोर्टाच्या या निर्णयानंतर राऊत वरच्या कोर्टात या निकालाविरोधात अपील करतात का हे पाहणे महत्त्वाच्या ठरणार आहे.

मोठी बातमी! पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द; मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर निर्णय

न्यायालयाच्या निर्णयावर राऊत काय म्हणाले?

कोर्टाने दिलेल्या निकालावर राऊतांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, मी न्यायालयाच्या आदेशाचा आदर करतो पण त्यांनी असा आदेश दिला यावर विश्वास बसत नाही. ज्या देशात पंतप्रधान गणेश उत्सवासाठी सरन्यायाधीशांच्या घरी जाऊन मोदक खातात, त्या देशात न्यायाची अपेक्षा कशी करता येईल, असे राऊत म्हणाले.

Maharashtra Politics : राजकीय आखाड्यात वडिलांचाच पराभव करू पाहणारे ‘पुत्र’

काय आहे प्रकरण?

हे प्रकरण 2022 सालचे आहे. मुलुंडमधील शौचालय घोटाळ्यात मेधा सोमय्या यांचा हात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. यानंतर किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांना या आरोपाचे पुरावे देण्याचे आव्हान दिले. मात्र संजय राऊत यांनी कोणताही पुरावा न दिल्याने मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर 100 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला होता. एक रुपयाचा घोटाळा झालेला नसताना, एक रुपयाचा घोटाळाचे पुरावे/ कागदपत्र नसताना संजय राऊत यांनी फक्त भीतीसाठी, बदनाम करण्यासाठी हा अपप्रचार केला आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube