धीरज घाटेंनाच तिकीट द्या! पदाधिकाऱ्यांचे थेट प्रदेशाध्यक्षांना साकडे; कसब्यात ट्विस्ट येणार?

धीरज घाटेंनाच तिकीट द्या! पदाधिकाऱ्यांचे थेट प्रदेशाध्यक्षांना साकडे; कसब्यात ट्विस्ट येणार?

Maharashtra Elections : राज्यात विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर (Maharashtra Elections) आल्या आहेत. इच्छुकांकडून मतदारसंघाची चाचपणी केली जात आहे. राजकीय पक्षांकडे तिकीटासाठी फिल्डिंग लावली जात आहे. तर दुसरीकडे काही इच्छुकांनी आणखी पुढे पाऊल टाकलं आहे. पुण्यात राजकीय घडामोडी वेगात घडू लागल्या आहेत. पर्वती (Pune News) मतदारसंघानंतर कसबा मतदारसंघातून भाजपाची धाकधूक वाढविणारी बातमी आली आहे. कसबा मतदारसंघात इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. तसेच तिकीट मिळेल या आशेने दावेदारी भक्कम करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

भाजपाचे शहराध्यक्ष धीरज घाटे आक्रमक झाले आहेत. कसब्यातून धीरज घाटेंनाच तिकीट द्या अशी मागणी त्यांच्या समर्थक पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यासाठी पदाधिकाऱ्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. त्यांच्याकडे ही मागणी करण्यात आली. कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव झाला होता. आता हा मतदारसंघ पुन्हा भाजपकडे आणता येईल यासाठी धीरज घाटेंना उमेदवारी दिली पाहिजे असा दावा पदाधिकाऱ्यांनी केला.

पर्वतीत भाजपाची वाढली धाकधूक! इच्छुकांकडून कागदपत्रांची जुळवाजुळव; भिमालेंचा पालिकेत अर्ज

तर दुसरीकडे हेमंत रासने यांनी पुन्हा निवडणुकीची तयारी केली आहे. याआधी पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी रासनेंचा पराभव करत आमदारकी मिळवली होती. आता पुन्हा आपल्याला संधी मिळावी यासाठी हेमंत रासनेंनी प्रयत्न सुरू केले आहेत. आणखीही काही इच्छुक तिकीटासाठी प्रयत्न करत आहेत. अद्याप उमेदवारीचा मुद्दा निकाली निघालेला नाही. त्यामुळे कुणाला संधी मिळेल याचं उत्तर अद्याप गुलदस्त्यातच आहे. परंतु पुण्यातील मतदारसंघात पक्षांतर्गत रस्सीखेच मात्र सुरू झाली आहे.

इच्छुकांची संख्या वाढू लागल्याने उमेदवार निश्चित करताना वरिष्ठ नेत्यांची चांगलीच दमछाक होणार आहे. बंडखोरी टाळण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, तिकीटासाठीचे निकष काय असणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सध्यातरी जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत.

पर्वतीत भिमालेंचे लॉबिंग सुरू

भाजपमधील इच्छुक उमेदवारांकडून कागदपत्रांची जुळवाजुळव केली जात आहे. अद्याप उमेदवार ठरलेले नसताना सुद्धा उमेदवारी मिळेल या आशेने तयारी सुरू करण्यात आली आहे. पर्वती विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार असताना सुद्धा इच्छुक उमेदवार श्रीनाथ भिमाले यांनी महापालिकेकडे ना हरकत प्रमाणपत्राची मागणी केली आहे. पालिकेच्या विविध विभागांमधील थकबाकी नसलेले ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळण्याबाबत श्रीनाथ भिमाले यांनी अर्ज केला आहे.

मोठी बातमी : पुणे मेट्रोचे लोकार्पण अन् भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्तेच होणार; नवा मुहूर्त ठरला

follow us
  • fb
  • instagram
  • youtube