“शेळकेंचा अहंकार वाढला, आमच्या कार्यकर्त्यांना धमक्या, आता जनताच”..रोहित पवारांनीही सुनावलं
Rohit Pawar replies MLA Sunil Shelke : लोणावळा येथील जाहीर सभेत काल खासदार शरद पवार (Sharad Pawar) चांगलेच चिडले. आमदार सुनील शेळके यांच्यावर घणाघाती टीका करत पुन्हा दमदाटी केली तर मला शरद पवार म्हणतात असा इशारा दिला. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही आमदार सुनील शेळके यांना फटकारलं आहे. आपल्याला कुणीच विरोधक राहिलेला नाही. याची माहिती सुनील शेळकेंना (Sunil Shelke) असावी. अशी परिस्थिती येते तेव्हा अहंकार वाढतो तोच अहंकार त्यांच्या बोलण्यात जाणवत आहे. पण कुणी कितीही धमकावलं तरी राज्यातील लोकं स्वाभिमानी आहेत ते नक्कीच उत्तर देतील, अशा शब्दांत रोहित पवार यांनी शेळकेंवर प्रहार केला.
रोहित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि काही मंत्री त्यांच्या त्यांच्या मंत्रालयाच्या कार्यालयात मोठ्या गुंडांना भेटतात. त्यांच्याबरोबर फोटो काढले जातात, रिल्स काढले जाातात. पण कोणत्याही मंत्र्याकडे जाण्याआधी पोलिसांची यंत्रणा असते. कुणाचं काय बॅकग्राउंड आहे याचा अभ्यास असतो. या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा जेव्हा अशा गुंडांना जवळ केलं जातं. फोटो बाहेर दिले जातात. त्यातून नेतेमंडळी काय संदेश देत आहेत तर गुंडागर्दीला आमचा पाठिंबा आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही त्यांचा वापर करू. या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर काही आमदारांना अहंकार येत असावा.
Sharad Pawar : शरद पवार इतके का रागावलेत? शिंदे गटाच्या आमदारानं दिलं करेक्ट उत्तर
सुनील शेळके ज्या भूमीतून येतात ती एक स्वाभिमानी भूमी आहे. पवित्र भूमी आहे. अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधीत्व करत असताना एवढा अहंकार तुमच्यात येतो की तुम्ही एका मोठ्या नेत्यावर खालच्या पातळीवर जाऊन बोलता हे आता लोकं सहन करणार नाहीत. तिथली राजकीय परिस्थिती पाहिली तर बाळा भेगडेंना भाजपकडून तिकीट मिळणार नाही अशी चर्चा तेथे आहे. याची माहिती सुनील शेळकेंना असावी. आमचा कुणीच विरोधक नाही अशी परिस्थिती येते तेव्हा अहंकार वाढतो तोच अहंकार त्यांच्या बोलण्यात जाणवला.
सुनील शेळके भाजपाच्या तिकीटावर लढणार
सुनील शेळके आधी भाजपात होते. नंतर साहेबांबरोबर आले. आत अजितदादांबरोबर गेले आहेत. त्यामुळे भाजपाची प्रवृत्ती आणि अहंकार त्यांच्यात दिसायला लागला आहे. ते त्या 12 आमदारांच्या यादीत आहेत ज्यांना भाजपाच्या तिकीटावर लढायचं आहे. इतर कुणालाच ते घाबरत नाहीत. गृहीत धरत नाहीत. साहेबांबद्दलच या पातळीवर बोलत असतील तर सामान्यांबद्दल काय बोलणार.
Lok Sabha : ‘जागावाटपावरून महायुतीत गडबड, भविष्यात भयानक परिस्थिती’; काँग्रेस नेत्याचा दावा
मलिदा गँगकडून धमक्या
बारामतीत असे काही स्थानिक नेते आहेत. जे सामान्य लोक त्यांना मलिदा गँग म्हणतात. तेथे हे लोक सामान्य नागरिकांना धमकावतात. काहींना नोकरीवरून काढून टाकतात आणि हे घडलंही आहे. असं जर झालं तर तुम्ही येत्या काळात बूथ सुद्धा ताब्यात घेऊ शकता. पोलिसांचा वापर करू शकता, गुंडांचा वापर करू शकता. ज्या लोकांनी तुम्हाला मतदान केलंय आज ते फक्त साहेबांबरोबर आहेत म्हणून तुम्ही त्यांना धमकावणार. मलिदा गँगवाले जे लोक आहेत ते धमकावत आहेत. पण कितीही धमकावलं तरी महाराष्ट्राचे लोक स्वाभिमानी आहेत ते नक्कीच उत्तर देतील.