Video : नव्या वर्षात काका-पुतणे एकत्र येणार? अजितदादांच्या आई म्हणाल्या, “सगळे वाद..”

Video : नव्या वर्षात काका-पुतणे एकत्र येणार? अजितदादांच्या आई म्हणाल्या, “सगळे वाद..”

Maharashtra Politics : आज नवीन वर्षाचा पहिलाच दिवस. या पहिल्या दिवसाची सुरुवात चांगली करावी यासाठी अनेकांनी सकाळपासूनच मंदिरात गर्दी केली आहे. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर, अक्कलकोटचे स्वामी समर्थ मंदिर, शेगाव, शिर्डी या ठिकाणी भाविकांची अलोट गर्दी झाली आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार यांनीही पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन घेतलं. यावेळेस त्यांनी केलेली एक मागणी राज्याच्या राजकारणात भूकंप घडवणार की काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

पंढरपुरातील पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर आशाताई पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सर्वांना सुखी ठेव अशी मागणी मी विठ्ठल रुक्मिणीकडे केली. पवार कुटुंबीय एकत्र यावे अशी इच्छा देवाकडे व्यक्त केली असे त्यांनी सांगितले. भविष्यात शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यावं का असे पत्रकारांनी विचारल्यानंतर होय असे उत्तर त्यांनी दिले. पांडुरंग तुमचं ऐकणार असे विचारल्यानंतर आशा पवार यांनी हात जोडत होय होय ऐकणार असे उत्तर दिले.

शरद पवार पुन्हा भाकरी फिरवणार? विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

आशा पवार यांच्या या वक्तव्यावर अजित पवार पक्षाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली. मिटकरी म्हणाले, ही त्यांच्या मनातील भावना आहे. घरातील मोठ्या व्यक्तींपैकी त्या एक आहेत. आदरणीय पवार साहेबही ज्येष्ठ आहेत. सर्व कुटुंबानं एकत्र यावं अशी आशा काकींची इच्छा आहे. मात्र ती सर्वांची हवी. तुतारी गटातील जितेंद्र आव्हाड,रोहित पवार यांनी एकत्र येऊ द्यायचं आहे का हे महत्वाचं आहे.

महायुतीत पालकमंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू? मुंबईवरून भाजप अन् शिवसेनेत स्पर्धा, अजित पवार गटाचं काय?

यानंतर शरद पवार पक्षाकडूनही प्रतिक्रिया आली आहे. पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे म्हणाले की एखाद्या माऊलीने अशी प्रतिक्रिया दिली असेल तर आनंदच आहे. पवार साहेब आणि अजित पवारांची राजकीय भूमिका वेगळी आहे. कुटुंबात काही क्लेष आहे अशातला काही भाग नाही. राजकीय भूमिका वेगळी असू शकते पण कुटुंब जर एकत्र येत असेल तर यापेक्षा आनंदाची दुसरी गोष्ट काय असू शकते असे महेश तपासे म्हणाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube