अजितदादा अन् रोहित पवारांची बैठक; फोटो ट्विट करत चाकणकर म्हणाल्या, “कामाच्या बाता मारणाऱ्यांना”…

अजितदादा अन् रोहित पवारांची बैठक; फोटो ट्विट करत चाकणकर म्हणाल्या, “कामाच्या बाता मारणाऱ्यांना”…

Rupali Chakankar replies Rohit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज (Ajit Pawar) कालवा सल्लागार समितीच्या बैठकीसाठी पुण्यात होते. या बैठकीसाठी आमदार रोहित पवार, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. या बैठकीत आमदार रोहित पवार (Rohit Pawar) सातत्याने पाठपुरावा करत असलेल्या मागणीला अजितदादांनी ग्रीन सिग्नल दिला. येत्या 1 मार्चपासून कुकडी प्रकल्पातून शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्याचे अजितदादांनी मान्य केले. या निर्णयाचा फायदा रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघातील 54 गावांना होणार आहे. त्यामुळे रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित अजित पवारांचे आभार मानले. मात्र, त्यांच्या या पॉलिटिकल कृतीवर अजित पवार गटाच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. (Ajit Pawar Faction Leader Rupali Chakankar made a statement and replies NCP MLA Rohit Pawar)

अजित पवार गटाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी रोहित पवारांना खोचक टोला लगावला आहे. “नाकाने कांदे सोलणाऱ्यांनो तुमचे आमच्या अजितदादांशिवाय पान हलत नाही. कामाच्या बड्या बड्या बाता करणाऱ्यांना आता मात्र मिरच्या झोंबतील.. अशा तिखट शब्दांत चाकणकर यांनी रोहित पवार यांच्यासह शरद पवार गटातील नेत्यांवर हल्लाबोल केला आहे.

Rohit Pawar : ‘तिकीट’ संकटात म्हणून दिल्ली दौरे वाढले का? रोहित पवारांचा विखेंना खोचक सवाल

रोहित पवारांनी मानले अजितदादांचे आभार 

दरम्यान, याआधी पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील सर्किट हाऊस येथे कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत काय निर्णय झाले याची माहिती रोहित पवार यांनी दिली. सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता कुकडी प्रकल्पातून 1 मार्चपासून पाणी सोडण्याच्या पाठपुराव्याला यश आले. उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कुकडी प्रकल्पातून 1 मार्च रोजी आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळं कर्जत तालु्क्यातील 54 गावांच्या शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याची अडचण दूर होण्यास मदत होईल.

या निर्णयाबाबत अजितदादा यांचे माझ्या मतदारसंघाच्यावतीने आभार! दरम्यान हे आवर्तन 40 दिवसांपेक्षा कमी असणार नाही… अन्यथा सर्व गावांना पाणी पोहोचणार नाही आणि लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण होईल हेही या बैठकीत निदर्शनास आणून दिलं. तसंच घोड प्रकल्पातूनही 1 मार्च रोजी पाणी सोडण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. शिवाय भीमा नदीकाठच्या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी एप्रिलमध्य भीमा नदीतून पाणी सोडण्यात येणार आहे. सीना धरणातूनही पाणी सोडण्याचा मुद्दा उपस्थित केला, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली.

Rohit Pawar : ठाकरेंची ‘मशाल’ अन् ‘तुतारी’ घेत लढायचं; रोहित पवारांनी सत्ताधाऱ्यांना ललकारलं

follow us
  • fb
  • instagram
  • youtube