Pune News : निवडणुकीआधी सुनेत्रा पवार शिवसृष्टीत; विविध विकासकामांची पाहणी
Pune News : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाची विशेष चर्चा होत आहे. या मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार लढत होईल अशी शक्यता आहे. महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळेच उमेदवार असतील पण महायुतीचा उमेदवार अजून ठरलेला नाही. तरीदेखील सुनेत्रा पवार यांनी मतदारसंघाचा दौरा सुरू केला आहे. मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. सुनेत्रा पवार यांनी आज पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आणि महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने नऱ्हे-आंबेगाव येथे साकारत असलेल्या ‘शिवसृष्टी’ला भेट दिली.
जानकरांची एन्ट्री.. विटेकरांचा बळी देऊन अजितदादांनी बारामती सेफ केली?
यावेळी शिवसृष्टीचे विश्वस्त जगदीश कदम, विनीत कुबेर, सुनील मुतालिक, माजी खासदार प्रदीप रावत, शिवसृष्टीचे व्यवस्थापक अनिल पवार, रुपाली चाकणकर प्रदीप गारटकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे धनंजय काळे, मनोज पोचट, सत्यजित कदम, सुधीर थोरात, आंबेगाव बुद्रुकचे माजी सरपंच संतोष ताटे, उपसरपंच नाना कांढरे, माजी नगरसेवक युवराज बेलदरे आणि रहिवासी आदी उपस्थित होते. यावेळी सुनेत्रा पवार यांनी येथे सुरू असलेल्या कामकाजाची पाहणी केली.
यावेळी प्रास्ताविक करताना जगदीश कदम म्हणाले की, येत्या ६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात येईल. सुमारे २१ एकर परिसरात व पाच टप्प्यात साकारणाऱ्या या प्रकल्पामध्ये ४३८ कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. जगदीश कदम यांनी उपस्थित सर्वांना प्रकल्पाची माहितीही दिली.
दरम्यान, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शिवसृष्टीला आताचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कधीकाळी विरोध केला होता. परंतु, आता निवडणुकीच्या तोंडावर राजकारणात बदस झाला आहे. त्याचा प्रत्यतही दिसून येत आहे.
Ajit Pawar भोळा माणूस त्या स्वभावामुळेच ते फसले; अजितदादांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून आव्हाडांचा टोला