खुर्चीचा वाद टाळण्यासाठी आघाडीची नामी शक्कल ; पुण्यातल्या सभेत नेत्यांना नो टेन्शन !

खुर्चीचा वाद टाळण्यासाठी आघाडीची नामी शक्कल ; पुण्यातल्या सभेत नेत्यांना नो टेन्शन !

Pune News : महाविकास आघाडी सत्तेतून पायउतार झाल्यापासून शिंदे-फडणवीस सरकारवर हमलावर झाली आहे. सरकारच्या विरोधातील मुद्द्यांवर रान उठवून सरकारला घेरण्याचा तिन्ही पक्षांचा प्रयत्न सुरू असतो. आता तिन्ही पक्षांनी एकत्र येत सरकारविरोधात वज्रमूठ सभा सुरू केल्या आहेत. पहिली सभा छत्रपती संभाजनगर येथे झाली. त्यानंतर पुढील सभा नागपुरात होणार आहे. तर 14 मे रोजी पुण्यात सभा होणार आहे.

पुण्यातील सभेची जोरदार तयारी सुरू असून या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत छत्रपती संभाजीनगरच्या सभेत घडलेल्या प्रकारावर चर्चा होऊन पुन्हा अशा चुका होणार नाहीत यासाठी नियोजन करण्याचे ठरले.

BJP Mission South : दक्षिणेत भाजपच्या ‘कमळा’समोरची आव्हाने अन् राजकीय समीकरणं

छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या सभेत उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवरून विविध चर्चा सुरू झाल्यानंतर पुण्यातील सभेत व्यासपीठावर एकाच प्रकारच्या खुर्च्या ठेवाव्या, अशी राष्ट्रवादी आणि काँग्रेसने मागणी केली. तसेच स्टेजवरील बॅकग्राउंडवर तिन्ही पक्षांचे चिन्ह लावण्यात यावे. सभेच्या ठिकाणी कोणत्याही नेत्याचे फोटो लावू नयेत, अशी मागणी या पक्षांनी केली.

छत्रपती संभाजीनगर येथील सभेत उद्धव ठाकरे यांना वेगळी खुर्ची देण्यात आली होती. या प्रकारावरून अजित पवार यांना स्पष्टीकरण द्यावे लागले होते. ठाकरे यांना पाठीचा त्रास असल्याने तशा प्रकाराची खुर्ची दिली होती. वज्रमूठ सभेत कोणताही भेदभाव झालेला नाही असे पवार म्हणाले होते. मात्र, सभेतील ही चूक पुन्हा होऊ नये यासाठी दोन्ही काँग्रेसचे नेते बैठकीत आग्रही दिसले.

CR Kesavan Join BJP : तीन दिवसात काँग्रेसला तीन धक्के! पहिल्या भारतीय गव्हर्नर जनरलचा पणतू भाजपात

दरम्यान, या बैठकीत आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मागणीवर अंमलबजावणी केली गेली तर सगळ्याच नेत्यांना एकाच प्रकारच्या खुर्च्या मिळतील. त्यामुळे बाहेर चर्चा होणार नाही आणि काही वेगळा संदेशही जाणार नाही. छत्रपती संभाजीनगर येथील सभेत उद्धव ठाकरेंना वेगळी खुर्ची देण्यात आली होती. त्यावरुन बराच वाद झाला होता. सभेत हा मुद्दाही चांगलाच चर्चेत होता. आता पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी तयारी करण्यात येत आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube