Loksabha Election : देशात पुढील वर्षी लोकसभा निवडणुकामध्ये (Loksabha Election) होणार आहेत. या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी तयाारी सुरू केली आहे. मात्र या दरम्यान सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल होत आहे. ती म्हणजे जे मतदार लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान करणार नाही. त्यांच्या बॅंक खात्यावरून 350 रूपये कापले जाणार आहेत. या बातमीमुळे नागरिकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. […]
Baramulla Encounter : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांची कारवाई सुरू आहे. दरम्यान, बारामुल्ला जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ (LOC) आज (शनिवारी) सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करत होते. काश्मीर पोलिसांनी सांगितले की, बारामुल्ला जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील हथलंगा येथील उरी भागात शनिवारी सकाळी चकमक झाली. परिसरात शोधमोहीम सुरू आहे. भारतीय लष्कर […]
नवी दिल्ली : यावर्षाच्या अखेरीसपर्यंत भारतात दक्षिण आफ्रिकेतून पुन्हा एकदा चित्ते आयात केले जाणार आहेत. उद्या (17 सप्टेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाला या निर्णयाची घोषणा होण्याची शक्यता आहे. यापूर्वी आयात केलेल्या आणि नवीन जन्म झालेल्या तब्बल 9 चित्त्यांच्या मृत्यूनंतरही आणखी चित्ते आयात केले जाणार असल्याने विरोधकांकडून या निर्णयावर टीका होण्याची शक्यता आहे. (Indian government […]
नवी दिल्ली : जागतिक नेत्यांमध्ये लोकप्रियतेच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी पुन्हा एकदा त्यांचे अव्वल स्थान कायम ठेवले आहे. मॉर्निंग कन्सल्टने केलेल्या सर्वेक्षणात मोदींच्या नावाला 76 टक्के रेटिंग देण्यात आले आहे. या यादीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन सातव्या तर, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (Russhi sunak) हे 15 व्या स्थानावर आहेत. या यादीत स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष […]
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासातील समजले जाणारे संजय कुमार मिश्रा अखेर अंमलबजावणी संचालनालयाच्या संचालकपदावरुन निवृत्त झाले. त्यांच्या जागी आता ईडीचे विशेष संचालक राहुल नवीन यांची प्रभारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नियमित संचालकाच्या नावाची घोषणा होईपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाचे प्रभारी संचालक म्हणून ते काम पाहणार आहेत. सरकारने काल […]
Road Accident : तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन माघारी परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाची मालवाहू ट्रकला जोरदार धडक (Road Accident) बसली. या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार झाले. या पाच जणात चालकाचाही समावेश आहे. पाचजण बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील बडची या गावचे रहिवासी आहेत. शुक्रवारी सकाळी आंध्र प्रदेशातील अन्नमया जिल्ह्यातील तिरुपतीजवळील कव्वीपल्ली येथे ही दु्र्दैवी घटना घडली. […]