Maratha Reservation : पुण्यातील नवले पुलावर मराठा आंदोलकांनी जाळपोळ केल्याप्रकरणी आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंहगड पोलिसांकडून 10 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. मराठा आंदोलकांनी काल नवले पुलावर प्रवासी वाहतूक थांबवत जाळपोळ केल्याची घटना घडली. या घटनेनंतर सिंहगड पोलिस ठाण्यात 10 जणांसह अन्य 400 ते 500 आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली आणि […]
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा यावर्षी 1 ऑगस्ट रोजी पुणे दौरा पार पडला. यावेळी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचा सोहळा, मेट्रो प्रकल्पाचा दुसरा टप्पा आणि पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा त्यांच्या उपस्थितीत पार पडला होता. पण पंतप्रधान मोदी यांचा हाच दौरा पुणे महापालिकेला तब्बस दोन कोटी रुपयांना पडला आहे. पंतप्रधान नरेंद्र […]
पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातील विविध भागात आंदोलक आक्रमक झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. काल (दि.30) बीडसह मराठवाड्यात अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या असून, आता याचे लोण पुण्यापर्यंत येऊन पोहोचले आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांनी शहरातील नवले पुलावर (Nawale Bridge) टायरची जाळपोळ करण्यात आली आहे. आंदोलकांनी सातऱ्याकडून मुंबईकडे आणि साताऱ्याकडे जाणारी […]
पुणे: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आंदोलन तीव्र केले आहे. तर काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण मिळाले आहे. मराठवाड्यात एसटी बसेसची तोडफोड, जाळपोळ केली जात आहे. त्यामुळे मराठवाड्यात जाणाऱ्या बसेस थांबविण्यात आल्या आहेत. बीड, लातूर आणि जालना या जिल्ह्यात जाणाऱ्या बसेस एसटी महामंडळाकडून थांबविण्यात आल्या आहेत. त्याचा फटका पुण्यातील प्रवाशांना बसत […]
Pune Crime : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीच्या घटना (Pune Crime) वाढल्या आहेत. त्यात आता पुन्हा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावेळी एका घरात घुसून एका पाठोपाठ एक अशा तिघांना गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. घोरपडे पेठेतील सिंहगड चौकात हा थरारक खुनाचा प्रकार घडला आहे. घरात घुसून तीन गोळ्या घातल्या रविवारी 29 ऑक्टोबरच्या मध्यरात्री अंदाजे […]
Maratha Reservation : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. याआधी त्यांनी सरकारला 40 दिवसांचा वेळ दिला होता. या मुदतीत सरकारने कोणताच निर्णय घेतला नाही. त्यामुळे विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठविली. या मुदतीत सरकारने काहीच केले नाही, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. या […]