- Letsupp »
- pune
पुणे
-
Market Committee Election : आधी मिळाले एक लाख, मतदानाचा फोटो दाखवा आणखी एक लाख घ्या !
Market Committee Election : राज्यात ठिकठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी (Market Committee Election) आज मतदान होत आहे. मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. गावकीच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या बाजार समितीच्या चाव्या आपल्याच ताब्यात रहाव्यात यासाठी नेते मंडळींनी जोर लावला आहे. मग मतदारांना पैशांचे वाटप असो, त्यांना सहलीला नेणे असो किंवा मतदानासाठी थेट बसने मतदान केंद्रांवर […]
-
Mallikarjun Kharge : गांधी कुटुंबाचे पोपट बोलू लागले, जगदिश मुळीक यांचे कॉंग्रेसवर शरसंधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर व्यक्तिगत टीका करणे व त्यांच्या आडनावावरून पोरकट वक्तव्ये करणे महागात पडते, हे आता सोनिया, राहुल गांधी व वाड्रा कुटुंबास पुरेपूर उमगल्याने आता पाळीव पोपटांच्या मुखातून असे उद्योग कॉंग्रेसने सुरू केले आहेत. मात्र, यातून कॉंग्रेसचे नैराश्यच उघड होत असून अशा हीन आरोपांना जनता मतदानातूनच पुन्हा कॉंग्रेसला जागा दाखवून देईल, असे प्रत्युत्तर भाजपचे […]
-
पुण्यात एक हजार ठिकाणी पंतप्रधानांची मन की बात; भाजपने केली जय्यत तयारी
Mann Ki Baat in Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मन की बात (Mann Ki Baat) या कार्यक्रमाचा 100 वा भाग येत्या रविवारी सकाळी 11 वाजता प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी भाजपने केली आहे. मन की बातद्वारे मोदींचे संबोधन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी नियोजन केले जात आहे. पुणे शहरात तब्बल एक हजार ठिकाणी […]
-
Pune : एकतर्फी प्रेमातून महिलेचा खून ; आरोपीला कर्नाटकातून अटक
पुण्यातील खडकी येथील दारूगोळा कारखान्यात दुचाकीवरून कामाला निघालेल्या महिलेला रस्त्यात अडवून तिचा खून केल्याप्रकरणी खडकी पोलिसांनी एकाला कर्नाटकातील विजापूर येथून अटक केली आहे. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडला असून आरोपीने हा खून केल्याचे तपासात उघड झाले आहे. दरम्यान, त्याच्या साथीदाराचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.नासेर बिराजदार (रा. खडकी) असे अटक […]
-
वेल्हे तालुक्याचं नामांतरण राजगड करा; अजित पवारांची मुख्यमंत्र्यांकडं मागणी
Ajit Pawar On Welhe Name Change : पुणे जिल्ह्यातील (Pune) वेल्हे (Welhe)तालुक्याचं नामांतरण राजगड (Rajgad)असे करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)यांच्याकडे केली आहे. पवार यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. मोठी बातमी ! पुणे लोकसभा पोटनिवडणूक लागण्याची शक्यता… त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं […]
-
मोठी बातमी ! पुणे लोकसभा पोटनिवडणूक लवकरच जाहीर होणार
Pune Lok Sabha Bypoll : भाजपचे ज्येष्ठ नेते तसेच खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक (Pune Lok Sabha Bypoll) लवकरच जाहीर होणार आहे. या निवडणुकीसाठी आता प्रशासनाने देखील हालचाली सुरु केल्या आहे. तसेच मतदानासाठी मतदान केंद्र सुस्थितीमध्ये आहे की नाही याची खात्री करून घ्यावी असे आदेश जिल्हा प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना देण्यात […]









