पवारांच्या आमदाराचा मुलगा ते दादांचा माजी नगरसेवक; पुण्यात भाजपच्या तिकिटासाठी तुफान रस्सीखेच

आगामी पुणे महापालिका निवडणूक भाजप स्वबळावर लढणार असं चित्रं जवळपास निर्माण झालं आहे. अर्जही वाटायला सुरुवात.

  • Written By: Published:
News Photo   2025 12 10T174618.281

पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. (Pune) यामध्ये आता उमेदवारी अर्ज देण्यास सुरुवात झाली आहे. दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना, काँग्रेस आणि भाजपनेही आपल्या इच्छुक उमेदवारांना पक्ष कार्यालयात उमेदवारी अर्ज देण्यास सुरुवात केली आहे. भारतीय जनता पक्षाकडून सर्वाधिक जवळपास 2200 इच्छुक उमेदवार यांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे. दरम्यान, हे सगळे भाजपचेच नसून सर्वपक्षीय इच्छुक उमेदवारही भाजपकडून उमेदवारी अर्ज घेताना पाहायला मिळालं आहे.

पुणे शहरातील सर्वपक्षीय जवळपास 21 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. यामध्ये सुरुवातीला पहिला टप्प्यामध्ये 11 माजी नगरसेवक प्रवेश करतील आणि नंतर दुसऱ्या टप्प्यात 10 माजी नगरसेवक प्रवेश करतील, अशी माहिती समोर आली आहे. मात्र, त्यापूर्वीच भाजपने उमेदवारी अर्ज द्यायला सुरुवात केल्यानंतर सर्वपक्षीय उमेदवारांची उमेदवारी अर्ज घेण्यासाठी गर्दीच केली.

Video : महायुतीच बघू, पुण्यात आमची तयारी पूर्ण, धंगेकर पुन्हा भाजप विरोधात मैदानात

हा उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी जे इतर पक्षातील इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी तर सर्वप्रथम हजेरी लावली. यामध्ये शरद पवार यांच्या विद्यमान आमदाराचा मुलगा, खडकवासला विधानसभा मतदारसंघातील एका माजी आमदाराची मुलगी, पर्वती विधानसभा मतदारसंघातील एका माजी उपमहापौराचा मुलगा आणि अजित पवारांचे काही माजी नगरसेवक हे भाजपचा अर्ज घेऊन गेल्याचं समोर आलं आहे.

दरम्यान, आगामी पुणे महापालिका निवडणूक भाजप स्वबळावर लढणार असं चित्रं जवळपास निर्माण झालं आहे. त्या दृष्टिकोनातून भाजपने संपूर्ण 165 जागांची तयारी केली असून सर्व प्रभागातून इच्छुकांचे अर्ज मागवले आहेत. यासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आली होती. या दोन दिवसांच्या मुदतीमध्ये तब्बल 2200 अर्ज इच्छुक घेऊन गेले आहेत. प्रभागवार विचार केला तर प्रत्येक प्रभागामध्ये 20 हून अधिक जण भाजपकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपचे इच्छुक मोठ्या प्रमाणात असताना इतरही आल्याने निष्ठवंतांची डोकेदुखी वाढली आहे.

follow us