काळीज पिळवटून टाकणारी घटना; अपघातात दोन मुलींसह पाच जणांचा मृत्यू

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 28T115018.226

पुणे जिल्ह्यात एक दूर्दैवी अपघात झाला आहे. शेतीची कामे करुन घरी येणाऱ्या शेतमजुरांना पिकअप जीपने चिरडले आहे. नगर-कल्याण महामार्गावर लवणवाडी येथे हा अपघात झाला आहे. या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. हे शेतमजुर आपले काम झाल्यानंतर पारनेरला आपल्या घराकडे परत चालले होते. यावेळी त्यांना जिपने धडक दिली. यातील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यात दोन मुली, दोन पुरुष व एका महिलेचा समावेश आहे.

शिरसाटांना ‘ते’ वक्तव्य भोवणार.. दानवे म्हणाले, आता थेट गुन्हा दाखल करणार

शेतातील सगळे शेतमजूर हे आपले काम संपल्यानंतर गावाकडे परत निघाले होते. यावेळी रात्रीच्या अंधारात पिकअप जीपने तब्बल आठ जणांना चिरडले. हा अपघात एवढा भीषण होता की यानंतर काही काळ परिसरातर वाहतूक कोंडी झाली होती. अपघातानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी उपचारादरम्यान 4 जणांचा मृत्यू झाला आहे.

Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण

या अपघाताची पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. यानंतर त्यांनी जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांनी अपघात स्थळांचा पंचनामा केला. मृत व्यक्तींचे शव हे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. शवविच्छेदन झाल्यावर मृत व्यक्तींचे शव कुटूंबियांना देण्यात येणार आहेत. या प्रकरणी गाडी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची चौकशी करण्यात येणार आहे.

Tags

follow us