Kalyani Nagar Car Accident : दोघांच्या जीव घेणाऱ्या ‘पोर्शे’चे फिचर्स, किंमत किती?

  • Written By: Published:
Kalyani Nagar Car Accident : दोघांच्या जीव घेणाऱ्या ‘पोर्शे’चे फिचर्स, किंमत किती?

पुणे : शहरातील कल्याणीनगर भागात चार दिवसांपूर्वी मध्यरात्री भरधाव वेगातील पोर्शे (Porsche Car) कारनं दोन आयटी तरूणांचा जीव घेतला. त्यानंतर आता अनेकांना ज्या कारनं दोन निष्पाप व्यक्तींचा जीव घेतला त्या कारचे फिचर्स, स्पीड, मॉडेल आणि नेमकी किंमत किती आहे असा प्रश्न पडला आहे. त्याच बद्दल आपण जाणून घेऊया. पोर्श टायकन असे या अपघातग्रस्त कारचे मॉडेल आहे. (Pune Kalyani Nagar Car Accident Porsche Car Details)

छोटा राजनचा फोन अन् गोळीबार, सुरेंद्र अग्रवालांकडून हत्येचा प्रयत्न; अजय भोसलेंचे गंभीर आरोप

बंगळुरू येथील डिलरने केली होती आयात

महाराष्ट्राचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, बेंगळुरू येथील एका डीलरने मार्चमध्ये ही पोर्श कार आयात केली होती. जी नंतर तात्पुरत्या नोंदणीसह महाराष्ट्रात पाठवण्यात आली.  तर, आरटीओ अधिकारी संजीव भोर म्हणाले की, “गाडी बेंगळुरूमधील एका डीलरकडून देण्यात आली होती. बेंगळुरू सेंट्रल आरटीओकडून याची तात्पुरती नोंदणी जारी करण्यात आली होती. जी 18 मार्च 2024 ते 17 सप्टेंबर 2024 पर्यंत वैध होती.

‘पब’वाल्याची नाही, डॉक्टरची चौकशी होणं गरजेचं; पुणे अपघातप्रकरणी सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल

किंमत किती?

पोर्श इंडिया वेबसाइटवर विविध मॉडेल्सच्या एक्स-शोरूम किंमती 96 लाख रुपयांपासून सुरू होऊन 1.86 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहेत. मात्र, या Taycan मॉडेलची किंमत देण्यात आलेली नाही.

कारचे फिचर्स काय?

पोर्श टायकन ही चार आसनी वेगवान लक्झरी स्पोर्ट्स कार आहे. तांत्रिकदृष्ट्या ही कार आत्याधुनिक असून, Taycan चे पाच मॉडेल सध्या भारतात उपलब्ध आहेत. यात पर्मानेंट मॅगनेट सिंक्रोनस मोटर लावण्यात आलेली आहे.

‘मला रात्री 3 वाजता फोन आला अन्..,’; अपघातानंतर घडलेलं टिंगरेंनी सांगितलं

तसेच यात 600A पल्स इन्व्हर्टर आणि हाय स्पीड आणि मोटरवे क्रूझिंगसाठी 2-स्पीड ट्रान्समिशन देण्यात आले आहे. Taycan RWD आणि Taycan 4S मध्ये 79.2 kWh ची बॅटरी आहे. तर, Taycan GTS, Taycan Turbo आणि Taycan Turbo S मध्ये 93.4 kWh बॅटरी पॅक आहे. Porsche Taycan ची रेंज एका चार्जवर अंदाजे 390 किलोमीटर इतकी आहे.

पुणे पोलिसांच्या ‘पाच’ चुका… ‘पोर्श अपघात अन् दोन निष्पापांचा बळी’ प्रकरण शेकलं!

स्पीड किती?
Taycan मॉडेलनुसार 750 bhp पर्यंत पॉवर आणि 1,050 Nm कमाल टॉर्क जनरेट करते. जे तीन सेकंदांपेक्षा कमी वेळेत 0 ते 100 किलोमीटर प्रति तास वेग पकडू शकते. मात्र, घटनेवेळी गाडीचा स्पीड 200 किमी इतका होता असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube