चाळीस लाखांचे मेफेड्रोन अन् पिस्तूल जप्त; पुण्यातील मोठ्या कारवाईने खळबळ

चाळीस लाखांचे मेफेड्रोन अन् पिस्तूल जप्त; पुण्यातील मोठ्या कारवाईने खळबळ

Pune News : राज्यात गणेशोत्सवास सुरुवात झाली आहे. या काळात पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था अधिक काटेकोर केली आहे. या गणेशोत्सवात पुण्यातील अंमली पदार्थ विक्रेत्यांवर नजर ठेवली जात आहे. याच दरम्यान अंमली पदार्थ विरोधी पथकाने पुण्यात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पथकाने जवळपास चाळीस लाखांचे मेफेड्रोन जप्त केले आहे. एक पिस्तुलही जप्त केले आहे. पुणे शहरातील कोंढवा भागात ही कारवाई करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

कोंढवा परिसरातील भाग्योदयनगर भागात एका एका युवकाकडे मेफेड्रोन असल्याची माहिती गस्त घालणाऱ्या पथकाला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने या युवकाच्या घरी छापा टाकला. त्यावेळी पथकाला त्याच्याकडून चाळीस लाख रुपये किंमतीचे 202 ग्रॅम मेफेड्रोन, एक पिस्तूल आणि मोबाइल असा 42 लाख रुपयांचा माल मिळून आला.  पुण्याचे अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे, उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे, संदीप शिर्के, प्रवीण उत्तेकर, संदेश काकडे, दयानंद तेलंगे पाटील, विपुल गायकवाड, योगेश मोहिते आदींच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दहशतवाद विरोधी पथकाने कोंढवा भागातच मोठी कारवाई केली होती. कोंढवा भागात छापेमारी केली होती. येथील एका जणाकडून तब्बल 3788 सिम कार्ड, लॅपटॉप आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले होते. या कारवाईने पुणे शहरात मोठी खळबळ उडाली होती. विदेशातून भारतात येणारे इंटरनॅशनल कॉल भारतातील यंत्रणेला समजू न देण्यासाठी पुण्यातील कोंढव्यामध्ये बनावट टेलिफोन एक्सचेंज सेंटर सुरू असल्याची धक्कादायक माहितीही आता उघड झाली होती.

Ganeshotsav 2024 : गणेशोत्सव काळात पुणे शहरासह ग्रामीणमध्ये मद्य विक्री बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

गणेशोत्सवाच्या काळात मद्यविक्री बंद

पुणे शहर आणि जिल्ह्यात गणेशोत्सवात ७ सप्टेंबर आणि १७ सप्टेंबर रोजी मद्य विक्री बंद राहील. तर, शहराच्या मध्यवर्ती भागातील फरासखाना, विश्रामबाग आणि खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीत (Pune) गणेशोत्सवाच्या कालावधीत ७ सप्टेंबरपासून १८ सप्टेंबर रोजी मिरवणूक संपेपर्यंत मद्य विक्री बंद राहणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी याबाबतचा आदेश काढला आहे.

गणेशोत्सवाच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मद्य विक्री बंद ठेवण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी शुक्रवारी सायंकाळी सुधारित आदेश काढला. त्यानुसार शहर आणि जिल्ह्यात गणेश प्रतिष्ठापनेच्या दिवशी ७ सप्टेंबर रोजी आणि विसर्जनाच्या दिवशी १७ सप्टेंबर रोजी मद्य विक्रीस बंदी राहणार आहे. शहरात १७ आणि १८ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत मद्य विक्रीस बंदी राहील.

मोठी बातमी! पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या बदलीला स्थगिती

follow us
  • fb
  • instagram
  • youtube