फ्रूट पल्प आणि कोळशाचा बॉक्स; पुण्यात सव्वा कोटीची बनावट दारू आली कशी ?
Fake Alcohol seized : नववर्षाच्या पूर्वसंध्येला गोवा बनावटीच्या मद्याचा (Fake Alcohol) बीमोड करण्याची मोहीम राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने सुरू केली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने (सासवड पथक) आणि भरारी पथक क्रमांक १ च्या पथकाने पु्ण्यात गोवा बनावटीची १ कोटीहून अधिक रुपयांची दारू जप्त (Fake Alcohol seized) केली. पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपूत (Charan Singh Rajput) यांनी याबाबत माहिती दिली.
वीणा अन् वनिता झाल्या सख्ख्या शेजारी! ‘या’ चित्रपटात शेजारधर्म निभावताना दिसणार
केवळ गोवा राज्यात विकल्या जाणाऱ्या दारूची महाराष्ट्रात तस्करी होत असते. कर चुकवून आयात होणाऱ्या या मद्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पुणे जिल्ह्यात पथके तयार करण्यात आली आहेत. गोवा राज्यातून ही बनावट दारू पुणे शहर आणि गुजरातला विक्रीसाठी पाठवली जाणार आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्काला मिळाली होती. त्यामुळे भरारी पथकाने नाकाबंदी करून ही कारवाई केली.
बिग बॉसमध्ये फक्त टीआरपीसाठी… वादग्रस्त दाखवलं जायचं; घनश्याम दरोडेनी केला खळबळजनक खुलासा
विटभट्टीसाठी लागणाऱ्या कोळशाच्या पावडरच्या आडून आणि फ्रुट पल्पच्या पॅंकिंगच्या नावाखाली ही बनावट दारू राज्यात आणली जात होती. या गोवा बनावट मद्याच्या ट्रकवर कारवाई करून 1 कोटी 20 लाख 32 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
चरणसिंग राजपूत यांनी सांगितलं की, एका प्रवासी लक्झरी बसमधून मोठ्या प्रमाणावर गोवा बनावटीची दारू पुण्यात आणली गेली होती. निगडीतील खासगी बस टर्मिनलवर या दारूचा साठा जप्त करण्यात आला. बसचा ड्रायव्हर आणि क्लिनर अटक केली. बसमध्ये विटभट्टीसाठी लागणारी कोळसा पावडर आणि गोवा बनावटीचे विविध मद्य बॉक्स मिळून आलेत. ड्रायव्हलरला अटक करून ज्यांना ही दारू डिलीव्हर होणार होती, त्यांनाही अटक करण्यात आली. नसरापूर फाट्यावर मोठ्या प्रमाणावर दारूचा साठा जप्त करण्यात आला. या कारवाईत मद्यसाठा, एक कार, एक सहा चाकी ट्रक, गोवा बनावटीचे १७१० बाटल्या (११६ पेट्या) असा एकूण ५१ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
दुसऱ्या घटनेत राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने निगडी गावाचे हद्दीत पवळे ब्रीज खाली एक लाख 34 हजार रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त केला. लक्ष्मी क्वीन ट्रॅव्हल कंपनीतून हा मुद्देमाल जप्त केला. सदरचा मद्यसाठा खडकी या ठिकाणी वितरीत होणार असल्याने त्या ठिकाणी जाऊन मद्यासह एकून पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले. तसेच दोन दुचाकी आणि एक सहा चाकी बस जप्त करण्यात आली आहे. यावेळी 68 लाख 37 हजार रुपये जप्त करण्यात आला.