Pune Rain : ‘पुणेकरांनो काळजी घ्या, पुढील काही तास विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी’, हवामान खात्याचा अंदाज
मुंबई : उन्हाळा तोंडावर असताना अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे बळीराजा संकटात सापडल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता पुढचे 5 दिवस राज्यात मुसळधार पाऊस (Pune Heavy Rain) होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून (IMD) देण्यात आली आहे. 2 दिवसांपासून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात विजांसह हलक्या पावसाने हजेरी लावली. पावसाला पोषक हवामान असल्याने आजपासून राज्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला.
रायगड, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, परभणी, औरंगाबाद, नाशिक, जालना, जिल्ह्यांतील काही ठिकाणी तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि 30-40 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील ३ ते ४ तासांत पुणे, सोलापूर, हिंगोली, लातूर या ठिकाणी जोरदार वादळी वारे विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, यामुळे घराबाहेर पडताना खबरदारी घ्या.
मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यात गारपिटीसह वादळी पावसाचा तर विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा ‘ऑरेंज’ अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. दरम्यान मागच्या 24 तासांता राज्यात विविध ठिकाणी वादळी वारे विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पावसाने धुमाकूळ घातला.
एक कोटींचं लाच प्रकरण नेमकं काय? फडणवीसांकडून संपूर्ण घटनेचा उलगडा
दरम्यान हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. ढगाळ हवामान, पावसाळी वातावरणामुळे कमाल तापमानात घट होत आहे. कोकणातील उष्ण लाट निवळली आहे. मात्र राज्याच्या विविध भागात उकाडाही वाढला आहे. मागच्या 24 तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी 37.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात बहुतांशी ठिकाणी कमाल तापमान 33 ते 37 अंशांच्या दरम्यान होते.