राहुल गांधींच्या जीवाला धोका असल्याच्या दाव्यावरून घूमजाव; वकिलांच्या परस्पर दाव्यानंतर काँग्रेसच्या सूचना
राहुल गांधींनी आपण मतचोरीचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे माझ्या जीवाला धोका आहे, अशी माहिती लेखी स्वरुपात पुण्यातील विशेष न्यायालयात दिली.

पुणे : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये (Assembly elections) मतचोरी (Vote Chori) झाल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) केला. भाजपने (BJP) हा निवडणूक आयोगाला (Election Commission) हाताशी धरून मतचोरी केल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, आता . अॅड. मिलिंद पवार यांनी राहुल गांधी यांच्याशी चर्चा न करता परस्पर पुणे न्यायालयात हा दावा केला होता. तो आता मागे घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
राहुल गांधी यांनी नीट वागावे, नाहीतर…
मिलिंद पवार यांनी न्यायालयात दिलेल्या लेखी माहितीनुसार, भाजपाचे नेते तरविंदर मारवा यांनी म्हटले आहे की, राहुल गांधी यांनी नीट वागावे, नाहीतर त्यांच्या आजीचे (इंदिरा गांधी) जे झाले, तेच राहुल गांधी यांचे होईल. भाजपाच्या आणखी एका नेत्याने राहुल गांधी यांना दहशतवादी म्हटले आहे. सध्याचे राजकीय वातावरण आणि या खटल्यातील याचिकाकर्ते सत्यकी यांचे गोडसे घराण्याशी असलेले संबंध पाहता राहुल गांधी यांच्या जीवाला धोका आहे.
महापालिका आपले निर्णय बदलत नाही; उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर काय म्हणाले मनपा वकील?
न्यायालयात दिलेल्या या माहितीमध्ये असेही लिहिले आहे की, भारतीय न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याबद्दल राहुल गांधी यांना संपूर्ण आदर आहे. तरीही हा खटला जसाजसा पुढे जातो आहे, तस तसा वाढणारा दबाव आणि बाहेरील असामान्य परिस्थिती यांची न्यायालयाने दखल घेतली पाहिजे. ज्या विचारधारेच्या लोकांनी हा खटला दाखल केला आहे, ते समाजात तेढ निर्माण करण्यासाठी धार्मिक वातावरण कलुषित करण्यासाठी, निवडणुकीत गैरप्रकार करण्यासाठी आणि ठराविक उद्योजकांचे भले करण्यासाठीपरिचित आहे, असे लेखी माहितीमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, हिंदुत्वाचे समर्थन करणारे जहालमतवाद्यांकडून आपल्या जीवाला धोका असल्याचे कारण राहुल गांधींच्यावतीने त्यांच्या वकिलांनी विशेष न्यायालयाला लिहिले आहे.