चाकण, तळेगावची कोंडी सोडवा; उद्योजकांच्या पत्रकार परिषदेनंतर जिल्हाधिकारी अॅक्शन मोडवर
traffic in Chakan and Talegaon क्षेत्रातील वाहतूक कोंडी सोडवा. असा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिला.
Resolve traffic congestion in Chakan and Talegaon District Collector in action following entrepreneurs’ press conference : पुण्यातील चाकण एमआयडीसीतील अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झाल्याने तेथील कर्मचाऱ्यांसह कंपन्यांना देखील याचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळे चाकणमधील उद्योजकांनी पत्रकार परिषद घेत या रस्त्यांच्या दुरावस्थेवरून सरकारला सवाल केला आहे. त्यानंतर ‘चाकण आणि तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करून वाहतूक कोंडी सोडवा. असा आदेश महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिला.
औद्योगिक क्षेत्रातील रस्ते दुरुस्त करणे, संबंधित कंपन्यांनी त्यांच्या आवारात वाहनतळाची व्यवस्था करणे, अतिक्रमणे हटविणे आणि या क्षेत्रातून राष्ट्रीय महामार्गांची दुरुस्ती ही कामे ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करा, असा आदेश महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी बुधवारी दिला.
मोठी बातमी! टेक ऑफ करताना उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, पायलटच्या लक्षात आलं अन्यथा…
चाकण व तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या आणि त्यावरील उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अभिजित चौधरी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग; तसेच ‘एमआयडीसी’च्या बांधकाम विभागातील अभियंते आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. चाकण आणि तळेगाव औद्योगिक वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेताना रस्ते दुरूस्ती वाहनतळ व्यवस्था आणि अतिक्रमण हटविणे या तीन बाबींवर विशेष भर देण्यात आला.
‘औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांची आवश्यक त्या ठिकाणी तातडीने दुरुस्ती करावी, कंपन्यांनी त्यांच्या आवारात पुरेशी वाहनतळ व्यवस्था करून द्यावी, सार्वजनिक रस्त्यांवरील अनधिकृत पार्किंगहटवून वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, अशा उपाययोजना करा,’ अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या.
प्रशासनाकडून ठोस उपायच नाहीत
चाकणच्या वाहतूक कोंडीची समस्या अचानक उद्भवलेली नाही. गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने त्याबाबत आवाज उठवूनही ठोस उपाययोजना करण्यात प्रशासनाला आलेले अपयश, हेच कोंडीचे सर्वांत महत्त्वाचे कारण आहे. पुणे-नाशिक रस्त्यावर नारायणगाव, आळेफाटा, मंचर आणि राजगुरुनगर (खेड) या चारही ठिकाणी बाह्यवळण मार्ग तयार करून येथे होणारी कोंडी कमी करायचे प्रयत्न झाले. मात्र, चाकण येथील कोंडी सोडविण्यासाठी बाह्यवळण मार्गाच्या दृष्टीने पुरेसे प्रयत्न झाले नाहीत.
तळेगाव-चाकण-शिक्रापूर हा मुख्य मार्गही याच ठिकाणाहून जात असल्याने त्यासाठी काही पर्यायी रस्ता तयार करता येईल का, अशी चाचपणी केली गेली नसल्याने ही कोंडी वाढतच गेली. शहरातील महत्त्वाचे चौक कोंडीमुक्त करण्यासाठी मोठमोठे उड्डाणपूल बांधले जात असताना चाकण चौक कोंडीमुक्त करण्यासाठी मोठ्या उड्डाणपुलाचा प्रस्ताव आतापर्यंत ना प्रशासनाने मांडला, ना राजकीय नेत्यांनी त्यासाठी आग्रह धरला. यामुळे कोंडी वाढतच गेली.
एक घड्याळ… एक अदृश्य सावली… आणि मृत्यूचं गूढ! ‘मृत्यूचक्र’चं रहस्यमय मोशन पोस्टर प्रदर्शित…
३१ ऑगस्टपर्यंत उपाय करा’ औद्योगिक क्षेत्रातील; तसेच सार्वजनिक रस्ते, नाले आणि वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे संबंधित यंत्रणांनी समन्वयाने हटवावी; तसेच चाकण आणि तळेगाव परिसरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची कामेही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
शिवगंगे टेकडीवर बेपत्ता आयआयटी पदवीधराचा शोध; ड्रोनला दरीत मृतदेहासारखी आकृती दिसली
औद्योगिक क्षेत्रातील वाढती वाहतूक, रस्त्यांची स्थिती, वाहनतळ आणि अतिक्रमणांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या नागरिक, कामगार; तसेच वाहनचालकांच्या सुरक्षिततेशी संबंधित आहेत. त्यामुळे संबंधित सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण कराव्या, असा आदेश देण्यात आला.