घड्याळ्याच्या हातात शिवबंधही कायम राहणार; आढळरावांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

  • Written By: Published:
घड्याळ्याच्या हातात शिवबंधही कायम राहणार; आढळरावांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

मंचर : शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते शिवाजी आढळराव पाटील (Shivaji Adhalrao Patil) यांनी आज (दि.26) अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. मात्र, हा प्रवेश करताना आढळराव पाटलांनी मध्य साधल्याची भूमिका निभावल्याचे दिसून आले आहे. राष्ट्रवादीत प्रवेश केले असला तरी, देखील घड्याळ्याच्या हातात शिवबंध कायम राहणार असल्याचे आढळराव पाटलांनी स्पष्ट केले आहे. आढळराव पटलांच्या जाहीर प्रवेशामुळे आता शिरूरमध्ये अमोल कोल्हे विरूद्ध आढळराव पाटील अशी लढत आता होणार आहे. ऐन निवडणुकांच्या तोंडावर आढळरावांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने अजितदादांचं टेन्शन संपल्यात जमा झाले आहे. आजचा प्रवेश ही घरवापसी अथवा लोकसभेच्या अनुषंगाने पर्याय नाही. तर नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी हे आम्ही उचलेलं पाऊल असल्याची भावनाही आढळराव पाटलांना पक्ष प्रवेश होण्यापूर्वी बोलून दाखवली होती. (Shivaji Adhalrao Patil Jion NCP In Presence Of AJit Pawar In Manchar)

माझे मोहिते पाटलांशी वैयक्तिक हेवेदावे नाही 

यावेळी त्यांनी वैयक्तिक हेवेदावे नाही पण राजकारणात समोरासमोर भांड्याला भांड लागतचं असं म्हणत मोहिते पाटील आणि आपल्या संबंधांवर स्पष्टीकरण दिले. आढळराव म्हणाले की, मी वीस वर्षानंतर स्वगृही परतत असून, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या दिलीपराव मोहिते पाटलांशी माझे कोणतेही वैयक्तिक हेवेदावे नाहीत. ते स्वभावाने अत्यंत चांगले आहेत. मात्र, राजकारणात समोरासमोर भांड्याला भांड लागतचं असतं असे म्हणच आढळरावांनी मोहिते पाटील आणि त्यांचे संबंध चांगलेच असल्याचे जाहीरपणे सांगितले.

मी अजितदादांवर नव्हे तर, उद्धव ठाकरेंवर टीका करायचो

राष्ट्रवादीत प्रवेश करण्यापूर्वी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आढळराव पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात मी अजित पवारांवर नव्हे तर, उद्धव ठाकरेंवर टीका करत होतो असा दावादेखील आढळरावांनी केला. कोल्हेंना पराभूत करण्यासाठी अजितदादांनी दिलेलं आव्हान मी माझ्या खांद्यावर उचलल्याचा विश्वास आढळरावांनी यावेळी बोलताना केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube